Posts

Showing posts from December, 2022
Image
माणगाव येथे युवा युवतीनां मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण संपन्न  माणगाव (प्रतिनिधी)माणगाव तालुक्यातील युवक युवतींना जिल्हा उद्योग केंद्र आणि क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशन च्या समन्वयाने मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणासाठी जिल्हा उद्योग केंद्र अलिबाग चे मा. श्याम बिराजदार, मा. प्रदीप सावंत, मा. प्रथमेश सुतार यांनी प्रशिक्षणार्थीची मुलाखत घेऊन निवड केली तसेच क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशनच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणा दरम्यान जिल्हा उद्योग केंद्राचे मा. मोहन पालकर यांनी प्रशिक्षणार्थीला जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांची माहिती दिली व प्रशिक्षणानंतर व्यवसायासाठी महिलांना 35% सबसिडी व पुरुषांना 25% सबसिडी भेटू शकते यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती दिली. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना माणगाव पंचायत समिती चे गटविकास अधिकारी माननीय प्रभे साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले याप्रसंगी क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशनच्या माणगाव तालुका व्यवस्थापक सौ. अश्विनी गणेश समेळ, मा. गायकवाड साहेब, मा. काप साहेब उपस्थित होते. त्यांनी प्
Image
  पुगांव येथे आ.अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते जल जिवन मिशन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन खांब (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील पुगांव येथे शुक्रवार दि.९ डिसेंबर रोजी आ.अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते १ कोटी ४3 लाख रुपयाच्या जल जिवन मिशन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व पुगांव बौद्धवाडी परिषद समाज सभागृहाचे उद्धघाटन करण्यात आले.यावेळी नारायण धनवी,रामचंद्र चितळकर,मनोज शिर्के,प्रकाश थिटे,संजय मांडळुस्कर ,श्रीकांत चव्हाण,मानसी चितळकर,सुधीर बारस्कर, प्रमोद म्हसकर,नंदकुमार झोलगे, घनश्याम बागुल, राम धूपकर, निलम कळमकर ,सुधीर शेळके, राम कळमकर, गोरखनाथ देवकर, किरण धूपकर, मारुती गोठम, दत्ताराम शेडगे, अशोक झोलगे,दिनेश देशमुख कृष्णराम देशमुख व असंख्य पुगांव ग्रामस्थ,महिला वर्ग व तरुण वर्ग उपस्थित होते.            यावेळी आ.अनिकेत तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि सुनिल तटकरे साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतांना पुगांव गावाची पाणी पुरवठा योजना मंजूर करून सुरु केली होती.त्या संघर्षाच्या काळात पुगांव ग्रामस्थ तटकरे कुटूंबाच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिले होते.नंतर ३० वर्षांच्या कालावधीन
Image
  एकाच कार्यक्रमाचे दोन नारळ फोडण्याची शेकापची संस्कृती नाही:-पंडितशेठ पाटील खांब (नंदकुमार कळमकर ) पुरोगामी तसेच शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा शेतकरी कामगार पक्ष आहे श्रमजीवी कष्टकरी शेतकरी वर्गासाठी झटणारा व त्यांना वेळोवेळी न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणारा त्याच बरोबर आमदार असो अथवा नसो परंतु जनतेची विकास कामे कधीही थांबवणारा शेतकरी कामगार पक्ष नाही तर एकाच कामाचे दोन दोन नारळ फोडण्याची ही शेतकरी कामगार पक्षाची संस्कृती नसल्याचे प्रतिपादन शेकापचे माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी पुगाव येथे केले . रोहा तालुक्यातील मौजे पुगाव येथे शनिवारी 10 डिसेंबर रोजी स्व हरिभाऊ म्हसकर यांच्या शताब्दी प्रित्यर्थ श्री शंकरराव हरिभाऊ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान व ग्रुप ग्राम पंचायत पुगाव तसेच आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर स्व हरिभाऊ म्हसकर सभागृह पुगाव येथे आयोजित करण्यात आले होते या शिबाराचे शुभारंभ माजी आ. पंडितशेठ पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील
Image
  मांजरवणे मोहल्यातील तरूणांनी जोपासला स्वच्छतेचा वारसा!   मांजरवणे तरुणांचं होतंय सर्वत्र कौतुक!       माणगाव (प्रतिनिधी)आज सर्वत्र तरूणाईवर अनेक कारणांमुळे अकारण टिका होत असताना माणगाव तालुक्यातील  मांजरवणे मोहल्ला येथील तरूणांनी सालाबादप्रमाणे मांजरवणे ते रानवडे या मार्गावरील पाच किलोमीटर वरील दुतर्फा वाढलेले गवत व छोटी अनावश्यक झाडे वेली तोडून स्वच्छतेचा वारसा जपला आहे.         मांजरवणे मोहल्यातील संस्कारशील तरूणांनी आपले कर्तव्य समजून ही स्वच्छता केली आहे. या रस्त्यावर सातत्याने अपघात होत असतात. तरूणांनी केलेल्या या स्वच्छतेमुळे वळणावरील वाहनं दूरवरून दिसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता कमी होईल.         हे सामाजिक कार्य या गावाचे पोलीस पाटील जलील फिरफिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिब सनगे ,शादाब सनगे ,अमीर टोळकर ,आजम वलिले यांच्यासह अनेक तरूणांनी पुढाकार घेऊन ही स्वच्छता केल्याने या पंचक्रोशीत मोहल्यातील या तरूणांचे कौतुक होत आहे.
Image
  रोहा प्रेस क्लबच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद,   132 दात्यांनी केले रक्तदान! कोलाड (श्याम लोखंडे) रोह्यातील दानशूर व्यक्तिमत्त्व, प्रेस फोटोग्राफर कै जनार्दन शेडगे यांच्या स्मरणार्थ रोहा प्रेस क्लब व कै जनार्दन शेडगे मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 132 पिशव्या रक्त जमा करण्यात आले. कै जनार्दन शेडगे यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा रक्तदान करून रूग्णांचे प्राण वाचवले होते. ती भावना कायम ठेवण्याच्या उद्देशाने रोहा प्रेस क्लबच्या वतीने तसेच सामाजिक बांधिलकी जपत गेली 20 वर्षं रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. गेली अनेक वर्षे अविरतपणे राबवित असलेला उपक्रम व या शिबिराच्या प्रारंभी कै जनार्दन शेडगे यांना मंडळाचे अध्यक्ष अरूण करंबे, दिलीप वडके, राजेंद्र जाधव यांच्यासह उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विजयराव मोरे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, रोहा तालुका सिटीझंस फोरमचे अध्यक्ष नितीन परब, निमंत्रक आप्पा देशमुख, महेश सरदार, अहमद दर्जी, दिलीप वडके, विजय देसाई, विलास कुलकर्णी, शरद पवार, उस्मानभाई रोहेकर, राजेश काफरे, शैलेश रावकर
Image
  प्रा.माधव आग्री यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित         कोलाड (विश्वास निकम ) रायगड रोहा तालुक्यातील तांबडी गावाचे सुपुत्र प्रा. माधव आग्री यांना प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच कोल्हापूर यांच्या वतीने सोमवार दि.२८ नोव्हेंबर  २०२२ रोजी राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात  आले.                 प्रा. माधव आग्री हे कोलाड रोहा लायन्स क्लबचे उपाध्यक्ष असून ते मुंबई कुणबी समाज संघ, रायगड जिल्हा कुणबी समाज, रोहा तालुका कुणबी समाज शहर अध्यक्ष,ओबीसी समाज या संघटनेत सामाजिक समाज हिताचे काम करीत आहेत.या सामाजिक कार्याची दख्खल घेत राष्ट्रपिता महात्मा जोतिबाफुले यांच्या स्मुतीदिनाचे औचित्य साधून राजेर्षी शाहू स्मारक भवन,मुख्यसभागृह कोल्हापूर येथे प्रा. माधव आग्री यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार  प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते बहाल करत सन्मानित करण्यात आले आहे.         यावेळी डॉ.श्रीपाल सबनीस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन माजी अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रा.डॉ.राजेखान शानेदिवाण जेष्ठ साहित्यिक व विचावंत,खासदार धैर्यशीलदादा माने,खासदार निवेदित
Image
 डॉ. सागर सानप यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रदान,सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव     कोलाड (विश्वास निकम) रायगड रोहा तालुक्यातील तसेच कोलाड विभाग पुई गावाचे सुपुत्र डॉ.सागर विठोबा सानप यांना प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच कोल्हापूर यांच्या वतीने सोमवार दि.२८ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे .    डॉ. सागर सानप हे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून कोलाड रोहा लायन्स क्लबचे अध्यक्ष असून ते मुंबई कुणबी समाज संघ , रायगड जिल्हा कुणबी समाज, रोहा तालुका कुणबी समाज,ओबीसी समाज या संघटनेत समाज हिताचे काम करीत आहेत.या सामाजिक कार्याची दख्खल घेत राष्ट्रपिता महात्मा जोतिबाफुले यांच्या स्मुतीदिनाचे औचित्य साधून राजेर्षी शाहू स्मारक भवन,मुख्यसभागृह कोल्हापूर येथे डॉ. सागर सानप यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले .          यावेळी डॉ.श्रीपाल सबनीस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन माजी अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रा.डॉ.राज
Image
  वीरशैव लिंगायत समाजाचा डोंबिवली येथे वधू वर पालक परिचय मेळावा रोहे (महादेव सरसंबे) महाराष्ट्र वीरशैव सभा ठाणे जिल्हा समिती व वीरसैव लिंगायत सेवा संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली येथे ११ डिसेंबर रोजी ३३ वा वधु वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आले असल्याचे महाराष्ट्र वीरशैव सभा प्रांतिक सदस्य बसवंतराव अळ्ळगी यांनी सांगितले आहे. वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोटजातील इच्छुक वधू-वरांचा व पालक मेळावा डोंबिवली येथील धर्मवीर आनंद दिघे सभागृह गांधीनगर डोंबिवली पूर्व येथे सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आले आहे. या वधू वर मेळावा दरम्यान विविध समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात महात्मा बसवेश्वर समाज रत्न पुरस्कार श्री चिदानंद बसवंतराव पाटील,संत शिरोमणी अक्कमहादेवी पुरस्कार श्रीमती प्रमिला विठ्ठल लंबे यांना देण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अंबरनाथचे नगराध्यक्ष अरविंद वाळेकर, अनंत हलवाई संचालक प्रफुल्ल शेठ गवळी,अध्यक्ष शांतकुमार लच्याने, कार्याध्यक्ष प्रदीप निलाखे, सरचिटणीस सिद्धेश्वर लिगाडे, सल्लागार चंद
Image
  उपचाराअभावी अखेर शेतकऱ्याची गर्भधारण गाय प्राणाला मुकली,रोह्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता याला जबाबदार कोण?   खांब (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यात गेली कित्येक दिवस पशु वैद्यकीय अधिकारी वर्गासह कर्मचारी वर्गाची कमतरता भासत असल्याने पशूंना वेळेत उपचार मिळत नसल्याने त्यांची जीवित हानी होत असल्याचे समोर आले आहे याला जबाबदार कोण असा गंभीर प्रश्न पशु पालकांकडून व्यक्त केला जात आहे . रोहा तालुक्यातील मौजे पुगाव येथील शेतकरी व पशुपालक समीर राजाराम धुपकर यांनी एक महिन्यांपूर्वी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गर्भधारण केलेली एक गाय ठराविक रक्कम देऊन विकत घेतली होती तिचा बिल्ला नंबर 103437/ 530282 तर 27 नोव्हेंबर रोजी तिचे दुर्दैवी अंत झाल्याने जणू आपल्या कुटूंबातील एक सदस्य गेला याचे दुःख झाले आहे आपल्या गोठ्यात गर्भधारण असलेले गाय हिचे पालन पोषण वेळोवेळी करत असलेले धुपकर आपल्या गाईला काही आजार असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी 27 नोव्हेंबर रोजी संबधित असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात थेट धाव घेतली परंतु त्यांच्या संबधित असलेल्या सदरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कोणीही पशुवैद्यकीय अधिकारी उपस्
Image
  जय हनुमान मित्रमंडळ गोवे आयोजित कबड्डी स्पर्धेत कालभैरव अकले महाड संघ विजेता,तर सोमजाई गोवे संघ उपविजेता   कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील गोवे येथे निसर्ग रम्य ठिकाणी शनिवार दि.२६/११/२०२२ सायंकाळी ६.०० ते रविवार दि.२७/११/२०२२ दुपारी १२.०० वाजेपर्यंत ५० किलो वजनी गटाचे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कालभैरव अकले महाड संघाने विजेते पद पटकावले. या कबड्डी स्पर्धेत रायगड व ठाणे जिल्ह्यातील ४८ संघानी सहभाग नोंदविला.या स्पर्धेतील अंतिम सामना कालभैरव अकले महाड विरुद्ध सोमजाई गोवे या दोन संघात झाला. या अटीतटीच्या लढतीत दोन्ही संघाच्या खेळाडूंनी बहारदार खेळ केला.परंतु अखेर कालभैरव अकले महाड संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ ठरला तर सोमजाई गोवे संघ द्वितीय क्रमांक, शिरगांव तृतीय क्रमांक तर रोहा संघ चतुर्थ क्रमांकाचे मानकरी संघ ठरले सर्व विजेता संघाना रोख रक्कम व चषक देण्यात आले.    स्पर्धेचे उद्धघाटन नरेंद्र जाधव कोलाड विभागीय अध्यक्ष,नितीन जाधव ग्रामपंचायत सदस्य,संदीप जाधव युव
Image
  सुभाष भोसले यांचे आकस्मित निधन कै. सुभाष भोसले   कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील वरसगांव येथील रहिवासी तसेच कोलाड वारकरी विभागाचे सदस्य सुभाष काशिराम भोसले यांचे बुधवार दि.२३/११/२०२२ रोजी अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ६३ वर्षाचे होते. ते प्रेमळ व जिद्दी स्वभावाने सर्वाना परिचित होते.त्यांनी ड्रायव्हरची नोकरी करुन आपले कुटुंब मोठया जिद्दीने उभे केले.परंतु त्यांच्या आकस्मित निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर पसरले आहे.   त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचे नातेवाईक,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक व वारकरी संप्रदायाचे असंख्य सदस्य व वरसगांव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,दोन मुलगे, सून,व मोठा भोसले परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी मंगळवार दि.६ डिसेंबर तर उत्तरकार्य विधी शुक्रवार दि.९ डिसेंबर २०२२ रोजी त्यांच्या वरसगांव येथील राहत्या निवास्थानी होणार आहेत.
Image
  पुगांव येथे श्री योगीराज दत्त जन्मोत्सव व अखंड हरीनाम सोहळा    खांब   - पुगांव (नंदकुमार कळमकर) श्री सद्गुरू पद्मनाभाचार्यस्वामी यांचे शिष्य संप्रदाय अमृतनाथस्वामी यांच्या कृपाछत्राखाली गुरुवर्य त्रिनयनस्वामी,सदाशिवस्वामी,अंबरधर स्वामी,शिवानंदस्वामी,नरेंद्रस्वामी, नरेंद्रनाथस्वामी यांच्या आशिर्वात्मक प्रेरणेने सांप्रदाय भारती गु, जनार्दनस्वामी (वाडीकर महाराज )सदानंद स्वामी, गोपाळ चव्हाण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तमोहोत्सव व अखंड हरिनाम सोहळा मार्गशिर्ष शुद्ध १३सोमवार दि.५/१२/२०२२ ते गुरुवार दि.८/१२/२०२२ पर्यंत साजरा होणार आहे.          या निमित्ताने पहाटे प्राप्तस्मरण सुदर्शन स्तोत्र व काकड आरती,सकाळी ७ ते ८ वा.घटस्थापना श्री व सौ.सुषमाताई सुभाष देशमुख,सकाळी ८ वा. ध्वजरोहन,सकाळी ९ वा.विणापूजन,सकाळी ९.३० वा.पंचरत्न गिता ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण, सा.५ ते ६ वा.प्रवचन,सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ,७ ते ९ हरिकीर्तन व रात्री ११ नंतर हरिभजन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.सर्व कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी सर्व कार्यकारिणी मंडळ व पुगांव ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.