रोहा येथील मुक्त पत्रकार राजेश हजारे यांना मातृशोक रोहा(प्रतिनिधी) रोहा येथील मुक्त पत्रकार तसेच आदिवासी, शोषित, वंचिताचे प्रश्न नेहमी आपले लेखणीतून मांडणारे ज्येष्ठ पत्रकार राजेश वामन हजारे यांच्या मातोश्री कै. मंगलाताई वामन हजारे यांचे डोंबिवली येथे वृद्धपकाळाने निधन झाले. सार्वजनिक जीवनात रोह्यामध्ये हजारे काकू म्हणून सर्वांना परिचित असलेल्या शांत, मनमिळाऊ, प्रेमळ, सत्वशील सरळ मार्गी, कष्टाळू, म्हणून परिचित असलेल्या तसेच सामाजिक कार्यात नेहमी हातभार लावणाऱ्या तसेच विश्व् हिंदू परिषदेच्या माजी जेष्ठ कार्यकर्त्या, दुर्गादेवी सत्संग मंडळाच्या मंडळाच्या ज्येष्ठ कार्यशील सदस्या श्रीमती मंगलाताई वामन हजारे यांचे नुकतेच वृद्धपकाळाने डोंबिवली येथे निधन झाले. धार्मिक अध्यात्मिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असायचा त्यांना अध्यात्माची त्यांना आवड असल्याने विविध धर्मग्रंथांचे वाचन नामस्मरणव्रत वैकल्ये करण्याची त्यांना आवड होती. दुर्गादेवी सत्संग मंडळाच्या अध्वर्य कै. विमलाताई मेहेंदळे यांच्या त्या निकटवर्तीय होत्या...
Posts
Showing posts from January, 2023
- Get link
- X
- Other Apps
वाल्याकोळ्याचा वाल्मिक ऋषी करण्याची ताकद त्याच्या बायकोत होती म्हणून तो वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला:-प्रितमताई पाटील कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण) वाल्याकोळ्याचा वाल्मिक ऋषी करण्याची ताकद फक्त त्याच्या बायकोत होती कारण त्याच्या बायकोनी सांगितले कि मी तूझ्या पापात मी वाटेकरी होणार नाही.आजच्या महिला शाळेत गेलेल्या व नोकरीला गेलेल्या मुलीला बोलतात कि तु सातच्या आत घरी ये त्याच प्रमाणे जो मुलगा रात्री बारा वाजेपर्यंत बाहेर असतो त्याला का लवकर घरी ये असे बोलले जात नाही.त्याच्यावर ही चांगले संस्कार करणे गरजेचे आहे. रामायण व महाभारत ग्रंथ वाचण्यापुरते नाहीत त्याचा बोध घेणे गरजेचे आहे. ऐनघर पंचक्रोशी ग्रामीण युवा बेरोजगार संघटनेचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने ऐनघर पंचक्रोशीतील व नागोठणे विभागातील बचत गटातील सर्व महिलांना एकत्र करून हा महोत्सव साजरा केला जात आहे. तसेच शासन बचत गटाच्या माध्यमातून विविध योजना राबवित असते यासाठी माझ्याकडून महिलांना कोणतेही सहकार्य लागले त्यासाठी तुम्ही माझ्या...