द.ग.तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडीचा शालांत परीक्षेचा निकाल 97.56 टक्के

सुतारवाडी :( हरिश्चंद्र महाडिक ) सु. ए. सो, च्या . द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडी या विद्यालयाचा एस. एस. सी. परीक्षेचा निकाल 97.56 टक्के इतका लागला असून कुमारी. केतकी राकेश तवटे हिला 85.80 टक्के मिळाले. ती विद्यालयात प्रथम आली तर कुमारी. आकांक्षा विनोद पाटील हिला 83.60 टक्के मिळून ती द्वितीय आली तर कुमारी. खुशबू दत्ताराम मोरे हिला 83 टक्के मिळून तृतीय आली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष श्री. वसंतराव ओसवाल, कार्याध्यक्षा गीताताई पालरेचा, सचिव श्री. रविकांत घोसाळकर त्याच प्रमाणे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. जी. काळेसर , सर्व शिक्षक आणि स्कूल कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय हे डोंगराळ ग्रामीण भागात असून या विद्यालयात विविध परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. या विद्यालयाचा एस. एस. सी. परीक्षेचा निकाल दरवर्षी उत्तम लागतो. या वर्षीही विद्यालयाचा निकाल उत्तम लागला असून दशक्रोशितील पालकांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. काळेसर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना धन्यवाद दिले. या विद्यालयासाठी सुसज्ज इमारत व मोठे मैदान असल्याने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळतो.

Comments

Popular posts from this blog