डॉ.सागर सानप यांना राष्ट्रीय आदर्श सामाजिक गौरव  पुरस्कार प्रदान,सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव!       

कोलाड (विश्वास निकम,रायगड भुषण) रोहा तालुक्यातील तसेच कोलाड विभागातील पुई गावाचे सुपुत्र डॉ.सागर विठोबा सानप यांना गोवा येथे रविवार दि.२६ मार्च २०२३ रोजी राष्ट्रीय आदर्श सामाजिक गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.डॉ. सागर सानप यांना या अगोदर दोन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून रविवार दि.५ मार्च २०२३ रोजी राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र नवश्रमिक सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र निर्मिती फिल्मी क्लब व सोमवार दि.२८ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच कोल्हापूर येथे राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.                               डॉ.सागर सानप हे कोलाड रोहा लायन्स क्लबचे अध्यक्ष असून ते  मुंबई कुणबी समाज संघ ,रायगड जिल्हा कुणबी समाज,रोहा तालुका कुणबी समाज,ओबीसी समाज या कमेटीवर समाजहिताचे काम करीत आहेत.डॉ. सागर सानप यांनी  कुणबी समाजासह बहुसंख्य समाजातील  गरजु विद्यार्थ्यांना वह्या,पुस्तके,दप्तर यांचे अनेक वेळा वाटप केले आहे.कुणबी समाजासाठी व ओबीसी समाजासाठी नेहमीच तत्परतेने काम करणाऱ्या डॉ. सागर सानप यांना सलग दोन राज्यस्तरीय पुरस्कार नंतर एक राष्ट्रीय आदर्श सामाजिक गौरव पुरस्कार   मिळाल्याने त्यांचे लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा,रायगड जिल्हा कुणबी समाज,रोहा तालुका कुणबी समाज, मुंबई कुणबी समाज,ओबीसी समाज यांचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य यांच्यासह बहुजन समाजाने अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog