संजय गांधी नगर येथे अखंड नामयज्ञ सोहळा

   कोलाड (विश्वास निकम,रायगड भुषण)गेली १६ वर्षांपासून चालत आलेल्या श्री. साती आसरा देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने तसेच सद् गुरु स्वामी गणेशनाथ महाराज यांच्या कृपाशिर्वादाने  सद्गुरू स्वामी हरिचंद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाने संजय गांधी नगर आंबेवाडी नाका येथे सालाबाद प्रमाणे अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या ९ व्या व १२ व्या अध्ययांचे पारायण व त्या निमित्ताने हरिपाठ,प्रवचन, किर्तन व भजन यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सोमवार दि.२० मार्च २०२३ रोजी मंगळविधी, कळस स्थापना,माऊली पूजन, विणापूजन, अनुष्ठान पूजन, ज्ञानेश्वरी पूजन, गुरुपूजन, ध्वजारोहन, सकाळी १० ते १२वा. ज्ञानेश्वरीचे ९ व्या व १२ व्या आध्ययाचे पारायण, दुपारी १२ ते २ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६ वा. कोलाड विभाग वारकरी संप्रदाय यांचा सामुदायिक हरिपाठ,६ते ७ वा.दिपोत्सव गुरुवर्य गुरुप्रसाद महाराज पाटील (उत्तराधिकारी खारपाले पेण), अदितीताई तटकरे (मा. राज्यमंत्री तथा मा. पालकमंत्री रायगड )अनिकेतभाई तटकरे (आ.विधान परिषद)ह.भ.प. ॲड. कृष्णा महाराज चवरे, ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत तसेच सन्मानीय प्रमुख पाहुणे व भाविक,८ ते ९ महाप्रसाद,रात्री ९ ते ११वा. ह.भ.प.ॲड. कृष्णा महाराज चवरे (पंढरपूर )यांची कीर्तन सेवा,रात्री हरिजागरण,

मंगळवार दि.२१ मार्च २०२३ रोजी पहाटे ४ते ६ वा.काकड आरती, सकाळी ९ ते ११वा. ह.भ.प. विजयानंद महाराज तेलंगे यांचे काल्याचे किर्तन,सायं.४ वा. दिंडी नगरप्रदक्षिणा, बुधवार दि.२२ मार्च २०२३ रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा, सर्व कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी श्रीकांत चव्हाण, अक्षय ओव्हाळ, सुनिल ठोंबरे, बबन काटरे, यशवंत लोखंडे, गणेश जाधव भगीरथ जाधव, चंद्रकांत लोखंडे, विराज जाधव, श्री गणेश सत्संग मंडळ, गणेश मित्रमंडळ, श्री साती आसरा महिला मंडळ, संजय गांधी नगर, आंबेवाडी नाका, व कोलाड वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी व सर्व सदस्य मेहनत घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog