पंचशील मित्र मंडळ बोर्ले यांच्याकडून पाणी वाटप


 साई /माणगांव (हरेश मोरे)तालुक्यातील मोर्बा विभागातील पंचशील मित्र मंडळ बोर्ले बौद्धवाडी यांच्या कडून सालाबादप्रमाणे 20 मार्च रोजी महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी ढालघर फाट्यावर पाणी वाटप करण्यात आले.

महाड चवदार तळे सत्याग्रहाचा 96 वा वर्धापन दिनानिमित्त 20 मार्च रोजी महाराष्ट्र राज्यातून मोठया बहुसंख्येने चवदार तळे येथे भीम अनुयायी येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक संघटने कडून विविध उपक्रम या दिनी राबविले जातात. असा उपक्रम पंचशील मित्र मंडळ बोर्ले यांनी भीम अनुयायी यांच्यासाठी मुंबई गोवा हायवेवर माणगांव येथील ढालघर फाट्यावर दिवसभर वाहनातून येणाऱ्या अनुयायांना बिसलेरी पाणी वाटप केले. प्रखर उन्हामध्ये उभे राहून हा उपक्रम करण्यात आला.

 यावेळी पंचशील मित्र मंडळ बोर्ले यांचे अध्यक्ष अमोल मोहिते, सचिव संदेश कासारे, उपाध्यक्ष संदीप पवार, मुंबई मंडळाचे सचिव अशोक मोहिते, राजू गायकवाड विवेक मोहिते, संतोष मोहिते, महानंद मोहिते, देवेंद्र मोहिते, विलास मोहिते, धीरज मोहिते, सुहेल मोहिते, सौरभ मोहिते, सुनिल मोहिते, सुधीर मोहिते यांनी पाणी वाटप उपक्रमात विशेष मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog