डॉ. सागर सानप व प्रा. माधव आग्री यांना सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय  पुरस्कार प्रदान,सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव!

  कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण)               रोहा तालुक्यातील तसेच कोलाड विभाग पुई गावाचे सुपुत्र डॉ.सागर विठोबा सानप व तांबडी गावचे सुपुत्र प्रा. माधव आग्री यांना सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. रविवार दि.५ मार्च २०२३ रोजी राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र नवश्रमिक सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र निर्मिती फिल्मी क्लब यांच्या तर्फे लायन्स क्लबचे कोलाड रोहाचे अध्यक्ष डॉ. सागर सानप व उपाध्यक्ष प्रा.माधव आग्री यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.या यशाबद्दल दोघांचे ही सर्वत्र शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे.                                                                                                                               डॉ. सागर सानप व प्रा. माधव आग्री या दोघांना ही तीन महिन्यांपूर्वी प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच कोल्हापूर यांच्या वतीने सोमवार दि.२८ नोव्हेंबर  २०२२ रोजी राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.दोघे ही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून ते दोघे ही मुंबई कुणबी समाज संघ ,रायगड जिल्हा कुणबी समाज,रोहा तालुका कुणबी समाज,ओबीसी समाज या कमेटीवर समाजहिताचे काम करीत आहेत.

    डॉ. सागर सानप व प्रा. माधव आग्री यांनी कुणबी समाजातील गरजु विद्यार्थ्यांना वह्या,पुस्तके,दप्तर यांचे अनेक वेळा वाटप केले आहे.कुणबी समाजासाठी नेहमीच तत्पर काम करणारे दोघांना ही सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने त्यांचे लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा,रायगड जिल्हा कुणबी समाज,रोहा तालुका कुणबी समाज, मुंबई कुणबी समाज,ओबीसी समाज यांचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य यांच्यासह बहुजन समाजाने अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog