आदिवासी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते शांताराम विष्णू पवार यांना पत्नीशोक!

 कै.सौ.जयश्रीताई पवार यांच्या निधनाने आदिवासी समाजात शोककळा!

  रायगड (प्रतिनिधी )रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या  सर्वांगीण विकासासाठी   नेहमी कटीबद्ध असणारे उरण येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम विष्णू पवार यांच्या पत्नी कै. सौ. जयश्री शांताराम पवार यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 45 वर्षे होते.

 नेहमी हसतमुख असणाऱ्या जयश्रीताई शांत व प्रेमळ  स्वरूपाच्या सर्वांना परिचित होत्या.

 रायगडातील आदिवासी समाजाच्या चळवळीत कार्यकर्ते श्री शांताराम विष्णू पवार यांचे मोठे योगदान असल्याने आदिवासी समाजामध्ये मेळावे, मोर्चा, विविध बैठका  आदिवासी समाजाचे विविध कार्यक्रम यामध्ये शांताराम पवार ही नेहमी उपस्थित  असायचे आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये जयश्रीताईंनी शांताराम पवार यांना खूप सहकार्य केले त्यांनी कधीही आपल्या संसारात कुरकुर केली नाही. आपल्या समाज बांधवांच्या विकासासाठी  सर्वतोपरी  सहकार्य केले. त्यांच्या पश्चात तीन मुली असून तीनही मुली उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आदिवासी बांधव कार्यकर्ते उपस्थित होते.

 त्यांच्या निधनाने आदिवासी समाजामध्ये तसेच उरण परिसरामध्ये शोककळा पसरली  असून त्यांचे दशक्रिया विधी दिनांक १३ मार्च  रोजी स.८ वाजता श्रीक्षेत्र माणकेश्वर उरण येथे होणार असून उत्तर कार्य दिनांक १६मार्च गुरुवार रोजी स.११ वाजता गणेश नगर गेट नं.१ घर नंबर ४३४६ उरण करंजा रोड, ता. उरण येथे होणार आहेत.

 कै.सौ.जयश्रीताई यांच्या निधनाने संपूर्ण रायगड जिल्ह्यात आदिवासी समाजात हळहळ व्यक्त केली जात  असून  उरण परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.


Comments

Popular posts from this blog