कुणबी राजकीय संघटनेच्या तळा तालुका सरचिटणीस पदी भास्करभाई कारे यांची निवड!
श्री.भास्करभाई कारे |
तळा(कृष्णा भोसले) कुणबी राजकीय संघटनेच्या तळा तालुका सरचिटणीस पदी भास्करभाई कारे यांची निवड घोषित करण्यात आली आहे.
मुंबईत झालेल्या सभेत त्यांच्या नावाची निवड जाहीर होताच त्यांच्या चाहत्यांकडून आनंद व्यक्त होत आहे. भास्करभाई कारे हे स्वराज्य प्रतिष्ठान रायगड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असून कुणबी युवाचे माजी उपाध्यक्ष आहेत. कुणबी ब्रिगेडचे ते सल्लागार असुन कुशल संघटक म्हणून त्यांचेकडे पाहीले जात आहे. या पदाचा उपयोग ते समाजातील पिडीत, सुशिक्षित, बेरोजगार तरुणांनाच्या समस्याकडे लक्ष देऊन करतीलअशी आशा निर्माण झाली आहे.
कुणबी राजकिय सघंटण समितीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
Comments
Post a Comment