तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून  संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान!

 सर्व दासभक्त व स्वच्छता प्रेमी अधिकारी व पदाधिकारी यांचा मोठा सहभाग!

माणगाव(प्रतिनिधी) संपूर्ण देशासह परदेशातही बैठकीच्या माध्यमातून व्यसनमुक्ती ,अंधश्रद्धा निर्मूलन  या लोकजागृतीचे कार्य करणाऱ्या आदरणीय तीर्थरूप  नानासाहेब धर्माधिकारी  यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 1 मार्च रोजी  महाराष्ट्र भुषण डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ.श्री.सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

  या अभियानात प्रामुख्याने सर्व शहरातील रस्ते, गटार ,सार्वजनिक ठिकाणे,सरकारी कार्यालय ,प्राथमिक आरोग्य केंद्र ,सरकारी रुग्णालय इ.ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आहे.

       माणगाव तालुक्याच्यावतीने समितीकडून माणगाव शहर ,निजामपूर शहर ,इंदापूर ,गोरेगाव यासह अनेक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.


   यामध्ये हजारो टन ओला व सुका कचरा गोळा करण्यात आला आहे.

        हे अभियान यशस्वी होण्यासाठी सर्व दासभक्त याबरोबर माणगाव नगरीचे नगराध्यक्ष श्री.ज्ञानदेव पवार ,  माजी रा.जि.प.सदस्य तथा माणगाव चे सुपुत्र मा.श्री.राजीव साबळे ,नितिनशेठ बामगुडे, माजी नगराध्यक्ष श्री.आनंदशेठ यादव नगरसेवक रत्नाकर उभारे ,राजेश मेहता ,दिनेश रातवडकर , राजेश शिर्के ,संदिप खरंगटे ,नगरसेविका सौ.खैरे  आदी मान्यवर उपस्थित होते.


       माणगाव समितीच्या वतीने करण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात माणगाव तालुक्यातील असंख्य लोकांनी सहभाग घेतला होता.

        तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी याच्या जन्मशताब्दीनिमित्त  करण्यात आलेल्या या  प्रतिष्ठानाच्या उत्कृष्ट कार्याचे सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog