काकडशेत ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग नागरीकांना सौर कंदील तसेच प्रत्येकी 500 रुपये वाटप!
तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील निसर्ग रम्यवातावरणात वसलेल्या काकडशेत ग्रा पं मध्ये येथील प्रशासकीय अनुभव असलेल्या कर्तव्य दक्ष ग्रामसेवक उमाजी माडेकर याचें संकल्पनेतून व सरपंच हर्षदा तापकीर यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या दिव्यांग नागरीकांना सौर कंदील व त्यांचे बॅंक खात्यात 500 रुपये वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दिव्यांग बंधू भगिनींना ग्रामपंचायतीचा 15 वा वित्त आयोग व ग्रामनिधी यातुन या योजनेचा लाभ देण्यात आला. यावेळी सरपंच हर्षदा तापकीर,ग्रा.पं सदस्य मंगेश काप, त्याचबरोबर सदस्या वंदना केळकर, प्राजक्ता राऊत, समिक्षा सपकाळ, लक्ष्मी दिवेकर, भारती साळवी आणि काकडशेत गावचे माजी अध्यक्ष अंकुश राऊत अपंग लाभार्थी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ग्रा. पं. हद्दीतील 26 लाभार्थींना याचा फायदा होणार आहे. यामुळे या दिव्यांग बंधू भगिनी यांचे चेहरयावरील हसु फुललेले दिसुन येत होते.
Comments
Post a Comment