श्रीक्षेत्र पळस येथे १३ मार्च पासून २८ वा अखंड हरिनाम सप्ताह, महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची होणार किर्तन सेवा

  कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण) रोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र पळस येथे श्री फळसाई मातेच्या कृपाछत्राखाली व सद्गुरू स्वामी गणेशनाथ महाराज तसेच सद्गुरू स्वामी हरिचंद्र महाराज पाटील यांच्या आशिर्वादामुळे फालगून कृ. श्रेष्ठी सोमवार दि.१३ मार्च ते फालगून कृ. नवमी गुरुवार दि.१६ मार्च २०२३ पर्यंत २८ वा.अखंड हरीनाम सप्ताह होणार असून या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची कीर्तनसेवा आयोजित करण्यात येणार आहे.

  इवलेसे रोप लावीयेले दारी l त्याचा वेणू गेला गगणावरी ll या संत महात्म्याच्या उक्ती प्रमाणे गेली २८ वर्षाची अखंड परंपरा राखत श्रीक्षेत्र पळस गावानी हा धार्मिक तथा अध्यात्मिक सोहळा जतन करुन ठेवला आहे.या निमित्ताने रोज सकाळी ५ वा. काकड आरती,सकाळी ९ ते १२ व २ ते ४ वा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण,सायं.५ ते ६ वा.हरिपाठ,६ते ७ वा.प्रवचन,रात्री ९.३० ते ११.३० वा हरिकिर्तन,नंतर हरिजागार होईल.

  सोमवार दि.१३/३/२३ रोजी सायं.५ ते ६ वा.विठ्ठल रखुमाई हरिपाठ मंडळ जांबोशी यांचा हरिपाठ, सायं.६ ते ७ वा ह.भ.प.विठोबा महाराज शिंदे पळस यांचे प्रवचन, रात्री ९.३० ते ११.३० वा.ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत (डोंबवली)यांचे किर्तन, रात्री श्री गणेश सत्संग मंडळ व नवतरुण मंडळ पळस यांचे जागरण, मंगळवार दि.१४/३/२३ रोजी सायं.५ ते ६ श्री दत्तसेवा हरिपाठ मंडळ (वरप) यांचा हरिपाठ,सायं.६ ते ७ वा.ह.भ.प. रघुनाथ महाराज रसाळ यांचे प्रवचन, रात्री ९.३० ते ११.३० वा.ह.भ.प. डॉ. मोहिनीताई पाबळे(आळंदी देवाची)यांचे किर्तन, रात्री एकादश ग्रुप पळस यांचे जागरण, बुधवार दि.१५/३/२०२३ रोजी सायं.५ ते ६ सामुदायिक हरिपाठ,सायं.६ते ७ दिपोत्सव ह.भ.प. गुरुप्रसाद महाराज पाटील आळंदी देवाची यांच्या उपस्थितीत,रात्री ९.३० ते ११.३० वा.भागवताचार्य ह.भ.प.भगीरथ महाराज काळे (सिन्नर-नाशिक) यांचे किर्तन,रात्री महिला मंडळ पळस यांचे जागरण,गुरुवार दि.१६/३/२०२३ रोजी सकाळी ९ ते ११ वा ह.भ.प. विजयानंद महाराज तेलंगे वाण्याची तळवळी यांचे काल्याचे किर्तन, सायं.४ते ६ वा श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी मिरवणूक होईल.

         सर्व कार्यक्रम यशश्विकरण्यासाठी शिवराम भाऊ शिंदे,मारुती शिर्के, हिराजी शिंदे,ज्ञानेश्वर शिर्के,चंद्रकांत भालेकर,योगेश विचारे,बबन शिंदे,संजय शिंदे,दिपक दुर्गावले, बबन भालेकर,लक्ष्मण भालेकर,उमाजी विचारे,अरुण कदम,नरेश भालेकर,परेश विचारे,चंद्रकांत दुर्गावले,शशिकांत शिर्के,प्रशांत भोईर, दगडू शिर्के,राकेश शिंदे, विक्रम दुर्गावले,गणपत शिर्के, परशुराम शिर्के,विठोबा शिर्के, मधुकर शिर्के,अशोक शिर्के,रघुनाथ शिर्के,काशिराम शिंदे,नामदेव शिंदे, संतोष भालेकर,लहू शिर्के,सौरभ विचारे,प्रमोद शिर्के,कानू शेलार,प्रकाश कालेकर व सर्व ग्रामस्थ मंडळ, तरुण मंडळ व महिला मंडळ पळस मेहनत घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog