श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवतेज मित्र मंडळ पुगांव येथे सांस्कृतिक स्नेह संमेलन, रसिकांची जिंकली मने!

 पुगाव- खांब (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील पुगाव गावातील शिवतेज मित्र मंडळ यांनी श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंती आयोजन मोठ्या थाटामाटात साजरा करीत सर्व प्रथम शिवप्रतिमा पूजन करून गावातील जेष्ठ नागरिकांनी शिव छत्रपती शिवाजी महाराजाप्रती जीवनचरित्र व कामगिरी विषयी माहिती पटवून दिली.  

  रात्री ७.३० वाजता रा.जि.प प्राथमिक केंद्र शाळा पुगाव च्या विद्यार्थी यांची सांस्कृतिक स्नेह संमेलन आयोजनामध्ये ४० विद्यार्थी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारीत मराठी गाणी,हिंदी गाणी,चारोळया, नाटिका इ. एकूण ३२  कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा हा मानस ठेवून त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात प्रोत्सहन देत त्यास रोख रक्कम बक्षीस व टाळ्याच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. व विद्यार्थ्यांना ही रसिकांची मने जिंकली.

  यासाठी शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक झोलगे व सर्व सदस्य तसेच रा जि प प्राथमिक केंद्र शाळा पुगावचे मुख्यध्यापक श्री निवास थळे सर व सहशिक्षक श्री साळवी सर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच सर्व कमिटी सदस्य, पालक ग्रामस्थ यांनी यशस्वी करण्याकरिता  मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog