महाड चवदार तळे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंकज तांबे व स्वप्निल शिर्के यांच्या हस्ते बुद्ध मूर्ती व संविधान देऊन सन्मान!
साई -माणगाव(हरेश मोरे) महाड चवदार तळ्याचा 96 व्या सत्याग्रहादिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे हे रविवार दि.19 मार्च 2023 रोजी चवदार तळे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी रात्री अकरा वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील गोळीबार मैदानातील सभा संपवून आले. त्यानंतर मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
त्यावेळी बौद्ध धम्म सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष पंकज तांबे व संस्थेचे उपाध्यक्ष स्वप्निल शिर्के यांनी मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांना बुद्धमूर्ती व भारतीय संविधान देऊन यथोचित सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.
यावेळी सन्मान करताना मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाड, माणगांव, पोलादपूर विधानसभेचे कार्यसम्राट, पक्ष प्रतोद व शिवसेनेचे उपनेते मा.आ.भरतशेठ गोगावले, युवा सेना प्रमुख विकास गोगावले, भिक्कू गण, भीम अनुयायी व असंख्य सेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment