संतोष सुतार श्रमिक पत्रकार पुरस्काराने सन्मानित!

साई /माणगांव (हरेश मोरे )माणगांव तालुक्यातील पळसगाव खुर्द येथील गावातील पत्रकार संतोष पांडुरंग सुतार यांना रायगड जिल्हा प्रेस क्लब कडून रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 रायगड प्रेस क्लबचा 18 वा वर्धापन दिन पोलादपूर पोलादपूर येथील बालाजी हॉटेल या ठिकाणी 26 मार्च रोजी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त व रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.यावेळी माणगांव तालुक्यातील पत्रकार संतोष सुतार यांना रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी रायगड -रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनिल तटकरे, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख,लोकशाही वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.

संतोष सुतार हे सन 2000 सालापासून पत्रकारिता करीत आहेत.त्यांच्या लेखणीची योग्य दखल घेऊन रायगड प्रेस क्लब कडून पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमासाठी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, महाडच्या माजी नगरध्यक्षा स्नेहल जगताप, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुषमा गोगावले, माजी सदस्य चंद्रकांत कळंबे, अपेक्षा कारेकर व रायगड प्रेस क्लबचे पदाधिकारी तसेच पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog