दहावी बारावी परीक्षा संपेपर्यंत क्रिकेट स्पर्धा बंद करण्यासाठी पालक वर्गाची मागणी,

 या स्तुत्य उपक्रमाचे रोहा तालुक्यात सर्वत्र स्वागत!

  कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण) सद्या दहावी व बारावीची परीक्षा सुरु असून या कालावधीत ही विविध असोसिएशनच्या क्रिकेट स्पर्धा सुरु आहे.विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात न गुंतता क्रिकेट कडे आकर्षित होतांना दिसत आहे त्यामुळे कमीत कमी दहावी बारावी परीक्षा संपेपर्यंत तरी क्रिकेट स्पर्धा बंद कराव्यात अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.

             ३० वर्षांपूर्वी फक्त दहावी व १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी मिळत होती कोणत्याही टक्केवारीची गरज नव्हती सद्या स्पर्धेचे युग सुरु असून शिक्षणात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे परंतु असे असले तरी टक्केवारीला महत्व प्राप्त झाले असून पुढील शिक्षण घेण्यासाठी उत्तीर्ण होऊन उपयोग नाही यासाठी अभ्यास करणे महत्वाचे आहे.

  आधुनिक युगात निकालाची टक्केवारी पाहता मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे.उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा मुलींचे जास्त आहे.याचे कारण मुली खेळाकडे न वळता अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करीत आहेत  त्यामुळे विविध क्षेत्रात मुलांपेक्षा मुलींना नोकरी मिळत आहे.त्यामुळे लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे याचे कारण मुलांचे शिक्षण व नोकरी हे ही आहे.त्यामुळे क्रिकेटमधील बॅट व बॉलच्या मागे धावण्यापेक्षा अभ्यास करणे महत्वाचे असून विद्यार्थ्यांचे लक्ष विचळंबीत होऊ नये यासाठी दहावी बारावी परीक्षा संपेपर्यत क्रिकेट व इतर स्पर्धा बंद करण्याची मागणी पालक वर्गातून केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog