सोनसडे ग्रामपंचायतीने 15 व्या वित्त आयोगाच्या अपंग निधीतून सौर कदिंल केले वाटप!

 शिवाय प्रत्येकी 500 रुपये रोख बँक अकाउंटला! 

तळा (कृष्णा भोसले)तळा तालुक्यातील सोनसडे या ग्रा. पंचायतीने 15 वा वित्त आयोगातुन  अपंग निधीतून सौर कंदील व पाचशे रूपये रोख देऊन अपंगाचा निधी खर्च केला आहे. या ग्रामपंचायतीचे कर्तव्य दक्ष ग्रामसेवक उमाजी माडेकर यांचे संकल्पनेतून व सरपंच माधुरी पारावे यांचे मार्गदर्शनानुसार 27 मार्च 2023 रोजी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सरपंच माधुरी पारावे, ग्रा. पं सदस्य भिमेश भेकरे, सौ. पोटले, परशुराम वरंडे, सामाजिक कार्यकर्ते महादेव पारावे पत्रकार कृष्णा भोसले, लाभार्थी बंधू भगिनी उपस्थित होते.

    या ग्रामपंचायत हद्दीत जवळपास 17 दिव्यांग लाभार्थी  असुन या लाभामुळे दिव्यांग्यांच्या   चेहऱ्यावर हसू आलेले दिसत होते. सौर ऊर्जेमुळे वीजबिल बचत होणार असून नियमित प्रकाश मिळणार आहे. त्याचबरोबर 500 रुपये प्रत्येकाच्या बॅंक खात्यात जमा होणार आहेत. ही आनंद देणारी हक्काची बाब आहे. दिव्यांग लाभार्थींना हक्काचा निधि आता मिळु लागला आहे. असे लाभार्थीनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले.

Comments

Popular posts from this blog