Posts

Showing posts from May, 2026
Image
  आपल्या कपाळावरचा गंध, मंदिरावरचा कळस, अंगणातील तुळस,घरातील माय,गोठ्यातील गाय, सुरक्षित ठेवायची असेल तर हिंदूंनी एकत्र येण्याची गरज:-हभप गौरीताई सांगळे    लव्ह जिहाद! आणि  धर्मांतराबाबत वज्रमुठ आवळण्याचे आवाहन!  दहा हजाराचा मेकअप करा पण अंगभर कपडे घाला!  जिच्या अंगभर कपडे ती जगातली सुंदर स्त्री! हभप गौरीताई सांगळे यांचा तरुणींना आवाहन!     कोलाड (विश्वास निकम)  हिंदूंच्या रक्षणासाठी आपण संघटित होणे गरजेचे आहे.आपल्याला कपाळावरचा गंध, मंदिरावरचा कळस, अंगणातील तुळस, घरातील माय,गोठ्यातील गाय,सुरक्षित ठेवायचा असेल तर हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे असे मत हभप गौरीताई सांगळे यांनी सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीतील आयोजित विराट हिंदू संमेलनात आपले मत व्यक्त  करतांना सांगितले     नात्यांचा आदर कसा करायचा असतो?बहीण भावाचे नाते नाते म्हणजे काय?पती पत्नीचे नाते काय असते? सासू सासऱ्याच्या आदर कसा करायचा?माता पित्याचेवर नतमस्तक कसे व्हायचे हे फक्त हिंदू धर्म शिकवतो.आपण शिवरायांचे वारसदार म्हणून जन्माला आलो आहोत.या ठिकाणी आपण जन्माला आलो आह...
Image
  आपल्या मृत्यू नंतर ही आपले नाव जगाने घेतले पाहिजे असे जिवन जगा:-हभप प्रियाताई निकम     कोलाड:- (विश्वास निकम) ज्या प्रमाणे आपल्या परिसरातील हभप पुरुषोत्तम महाराज पाटील उर्फ (बापू )यांनी समाजासाठी केलेले निस्वार्थी समाजकार्य यामुळे ते निघून गेल्यावर त्यांच्या आठवणी समाजात जागृत आहेत. यामुळे जिवन जगत असतांना असे जिवन जगा कि आपण निघून गेल्यानंतर ही आपले नाव समाजात घेतले पाहिजे असे मत हभप प्रियाताई गणेश निकम यांनी हेटवणे येथील निकम भावकीच्या कुळदेवीच्या श्री सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त आयोजित किर्तन सेवेत व्यक्त केले.               कुळीची हे कुळदेवी l केली ठायी संतांनी ll१ll बरवे जाले शरण गेलो l उगवलो संकटी ll ध्रु ll आणीला ही रुप बळे l करुनि खळे हरिदासी ll२ll तुका म्हणे समागमें l नाचों प्रेम लागलो ll३ll या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे हभप प्रियाताई निकम यांनी सांगितले कि आमच्या कुळातील कुळदेवीची संतांनी माहिती करून दिली बरे झालो मी शरण गेलो त्यामुळे माझी संकटे नाहीशी झाली. मोठ्या भक्तीच्या बळावर या संतांनी देवी...
Image
  रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील घटना!   अवेळी पडणाऱ्या पावसात वीज पडून १४ वर्षीय  वेदांतचा दुर्दैवी  मृत्यू    वेदांत नुकताच आठवी पास झाला होता! तळा (प्रतिनिधी ) रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील कर्नाळा येथे शनिवारी ९ मे रोजी दुपारी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज अंगावर पडून वेदांत जनार्दन भोसले या अवघ्या १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.  या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून कर्नाळा ग्रामस्थांकडून तसेच पंचक्रोशी मधून  हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत हा अवकाळी पावसामुळे वाड्याजवळ गुरांना ठेवलेली पेंढे झाकण्यासाठी गेला होता. पेंढे झाकून झाल्यावर  वेदांतवर विज कोसळली  त्यात वेदांत गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्याला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली असून भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वेदांत हा अभ्यासात हुशार व शांत स्वभावाचा असून तो नुकताच आठवी पास झाला होता असे शिक्षक आ...
Image
    सुधागड तालुक्यातील घटना!  अवकाळीच्या पावसाच्या  तडाख्यात राजिप शाळा झाप शाळेचे पत्रे उडून मोठे नुकसान     कोलाड (विश्वास निकम )  संपूर्ण रायगड जिल्ह्यात शनिवार दि.९ मे रोजी दुपारी २.३०  वाजण्याच्या  सुमारास वादळ वाऱ्यासह अवकाळी  पावसाने जोरदार हजरी लावली.यामुळे नागरिकांची मोठी तारांबल उडाली. या अवकाळीच्या तडाख्यात सुधागड तालुक्यातील झाप रायगड जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले असुन यामुळे शाळेचे मोठे नुकसान झाले आहे.    अचानक वादळ वाऱ्यासह तुफान पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उमळून पडली. तर काही ठिकाणी घरांचे पत्रे व कौले उडाली यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे.यामुळे विज पुरवठा खंडित झाला.तसेच बाजापेठेतील व्यवसायिकांसह नागरिकांची तसेच अनेक ठिकाणी हळदी व लग्न समारंभातील नागरिकांची तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले.    याबरोबर वीटभट्टी व्यावसायिक यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या अवकाळी पावसामुळे आंबा, काजु,फणस,या पिकांचे ही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे प्रशासनकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे अहवा...