तळा आरोग्य विभागाचे वतीने आशा दिन उत्साहात साजरा!

तळा( कृष्णा भोसले) आज आशा दिनाचे औचित्य साधत तळा आरोग्य विभागाचे वतीने आशा दिन साजरा करण्यात आला. सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला पुष्पहार घालुन दिप प्रज्वलन करीत कार्यक्रमाची सुरुवात झाली.

     या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. कुलदीप बोंगे गटविकास अधिकारी तळा यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी वंदन कमार पाटील, श्री देशमुख, तळा वैद्यकीय अधिकारी मोधे ,त्याचबरोबर  आशा, गटप्रवर्तक, मादांड भानंग,तळेगाव, पिटस ई, येथील समुदाय संघटक, तळा आरोग्य सहाय्यक नांदगावकर, श्रीमती सुजाता जाधव, कानिटकर, नागरी आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, उपस्थित होते. 

  यावेळी रांगोळी स्पर्धा, संदेशपर गिते, सावित्री ओवी, प्रबोधन गिते, आणि आशा नी आपली मनोगते व्यक्त केली.

तालुका आरोग्य अधिकारी यांनी आशानी जास्त जास्त काम करून जास्त पैसे कमवावे असे आवाहन केले. तालुक्यात आशाचे काम हे चांगल्या प्रकारे चालले आहे. आशाना ठराविक मानधन नसुन त्यांना कामाचा मोबदला दिला जातो. आशा ही आरोग्याचा कणा आहे. तिचे कौतुक

त्यानी केले. या कार्यक्रमात आशाना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.

   तळा तालुक्यात आशांचे काम खुप चांगल्याप्रकारे चालले आहे. ते असेच चालू राहू दया. असेही त्यांनी सांगितले. सर्वच आशाचे काम चांगले असल्याने सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असे शेवटी त्यानी सांगितले.

Comments

Popular posts from this blog