Posts

Showing posts from April, 2026
Image
  द्वादशम हिंद केसरी बकासुराचे रोहा संभे येथील मैत्री चषक स्पर्धेत होणार आगमन,  हजारो क्रिकेट खेळाडूंसह रसिक प्रेक्षकांना घडणार दर्शन! कोलाड (श्याम लोखंडे) प्रमोद अनंत म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान पुरस्कृत गोवा रायडर्स ग्रुप आयोजित मैत्री चषक - २०२६ द्वादशम हिंदकेसरी देव याचे मैत्री चषक २०२६ क्रिकेटची पंढरी असलेल्या संभे मैदानावर शनिवारी १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७:३० वाजता आगमन होत असल्याने क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंसह रसिक प्रेक्षक या साऱ्यांची उत्सुकता द्वादशम हिंद केसरी देव बकासुर याला पाहण्याची आणि त्याच्या दर्शनाची झाली आहे.  रायगड रोहा तालुक्यातील पुगाव गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते प्रमोद अनंत म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान पुरस्कृत मैत्री चषक व रोहा तालुका असोसिएशन प्रीमियर लीग चषक स्पर्धा १४ एप्रिल ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत पाच दिवस भव्य दिव्य रजनी प्रकाशझोतातील स्पर्धेचे दिमाखदार क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत तसेच उदघाटन सोहळा मंगळवारी १४ एप्रिल रोजी सायंकाळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर व आयोजक प्रमोद म्हसकर आदी...
Image
कोलाडमधील सर्वसामान्यांच्या हाकेला धावणारे लालासाहेब शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न!    असंख्य  चाहत्यांनी मित्रमंडळींनी वाढदिवसाच्या दिवशी निवासस्थानी जाऊन दिल्या शुभेच्छा!   मित्रमंडळी व जोडलेली माणसं ही माझ्या आयुष्यातील खरी संपत्ती:- लालासाहेब शिंदे  कोलाड (प्रतिनिधी )समस्या घेऊन जाणारा व्यक्ती जो कुठल्याही पक्षाचा असो! जातीचा असो! धर्माचा असो! त्याच्या समस्येचे निवारण होणारच त्याच्यातून मार्ग निघणारच!असे व्यक्तिमत्व म्हणजे  कोलाड मधील सामाजिक कार्यकर्ते  लालासाहेब शिंदे होय.  नुकताच लालासाहेब शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसाला मित्र मंडळींनी चाहत्यानी तुफान गर्दी केली होती. एखाद्या राजकारणी पुढाऱ्यालाही लाजवेल असा मोठ्या प्रमाणामध्ये मित्र मंडळी लालासाहेब शिंदे यांच्या घरी निवासस्थानी  जमले होते.  लालासाहेब शिंदे हे सर्वसामान्यांचे हाकेला धावणारी व्यक्तिमत्व अशी तालुक्यामध्ये त्यांची ओळख आहे. ते नवज्योत मित्र मंडळ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून समाजसेवेची व्रत हाती घेऊन राजकारणामध्ये सक्रीय असतात.  वरस...
Image
  अद्भुत दैवी शक्ती श्री क्षेत्र भातसई येथे महादेवीचे भगत गळ लाऊन आरूढ, हर हर महादेवाचे गजर,  भक्तांच्या उपस्थितीत गळाचा सोहळा, अनेकांच्या नयनांनी टिपला क्षण! कोलाड ( श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील हाकेला धावणारी व नवसाला पावणारी आदर्शगाव भातसई गावची स्वयंभू श्री महादाई महादेवी मातेचा पालखी व यात्रा उत्सव सोहळा मंगळवारी ३१ मार्च व बुधवारी १ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी उत्सवाच्या आदल्या दिवशी मंगळवारी दुपारी १२ वाजता देवीची पालखी मिरवणुक सोहळा गावहद्दीतील गावागावात सुरू करण्यात आला तर भातसई गावातुन येशीच्या मंदिरातुन सुरुवात केली तद्नंतर पालखी झोलांबे, कोपरे या गावात गेली.त्यानंतर पालखी झोलांबे गाव ,लक्ष्मीनगर येथे फिरवून रात्री ७ वाजता आदर्शगाव  भातसई गावात घरोघरी भक्तीमय वातावर्नात ग्रामस्थ नागरीकांना दर्शन देत फिरून महादेवी मंदिरात आली.तर दुस-या दिवशी बुधवारी १ एप्रिल रोजी महादेवी मातेचा यात्राउत्सवाला सुरुवात होताच सकाळ पासुनच भक्तगण नवस घेऊन मंदिरात वाजत गाजत येत होते. सर्व रायगड जिल्ह्यातील व बाहेरून जिल्ह्यातील भक्तांचे जनसागर महादेवी आ...