वार्षिक तांत्रिक देखभाल व दुरुस्तीसाठी दिनांक १३ मार्च ते १७ मार्च २०२३ पर्यंत रायगड रोप-वे बंद राहणार!  

रायगड(प्रतिनिधी)छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर सबंध भारतातून रायगड किल्ला पाहण्यासाठी पर्यटक  येत असतात. रायगड किल्ला पहावा अशी अनेक शिवभक्तांची  इच्छा असते. मात्र काही पर्यटक शिवभक्त हे वयोवृद्ध असल्याने पायऱ्या आणि खडतर अंतर पार करणे सर्वांना शक्य होत नाही त्यामुळे अनेक वयोवृद्धांना दिव्यांग लहान मुले, महिलावर्ग, यांना रायगड सहजा सहज पाहता यावे यासाठी रायगड रोप-वे तयार करण्यात आला आहे. या रायगड रोप-वे मुळे अनेकांना चार मिनिटात रायगडावर पोहोचणे शक्य होते.

 मात्र रायगड रोप-वे वार्षिक तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीसाठी दिनांक १३ मार्च ते १७ मार्च २०२३, ह्या कालावधीत  रोप -वे बंद राहील. पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी रोप-वे प्रशासनाकडून हे निवेदन पत्रकाद्वारे देण्यात आल्याची माहिती रायगड रोप-वे प्रकल्प प्रबंधक राजेंद्र खातू यांनी प्रसिद्धीसाठी पत्रकारांना दिली आहे. पर्यटकांनी व शिवभक्तांनी  अधिक माहितीसाठी मो.न. ७४४७७२४९९३,तसेच ७४४७७२४९९५ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच दिनांक १३ मार्च ते १७मार्च २०२३ रोजी रायगड रोपवे बंद राहील याची नोंद घेण्याचे रायगड रोपवे प्रकल्प प्रबंधक यांच्याकडून  आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog