पाली बाजारपेठेतील रस्ता सुसाट,परंतु गतिरोधक नसल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका!

  कोलाड ( विश्वास निकम,रायगड भुषण )सुधागड तालुक्यातील पाली हे तालुक्याचे ठिकाण असून पाली ही नगरपंचायत  झाल्यानंतर दिवसेंदिवस पालीचा विकास होतांना दिसत आहे.पाली बाजारपेठेतील रस्ते अनेक वर्षापासुन निकृष्ट दर्जाचे होते.परंतु या बाजारपेठेतील रस्ते दोन महिन्यांपूर्वी सुसाट बनवले आहेत.यामुळे या बाजारपेठेतून टूव्हीलर,थ्रीव्हीलर,फोरव्हीलर,वाहने रस्त्याला गतिरोधक नसल्यमुळे सुसाट वेगाने जात आहेत.त्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

            तसेच पाली येथे अष्टविनायक गणपती  पैकी एक बल्लालेश्वराचे मंदिर असून येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येजा करीत  असतात तसेच येथे शाळा कॉलेज असल्याने असंख्य विद्यार्थी,दूध विक्रेते,बाजारपेठेत येणारे असंख्य नागरिक येथूनच येजा करीत असतात.यामुळे वेगात जाणाऱ्या वाहनांमुळे मोठा अपघात होऊ शकतो.यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून सुसाट जाणाऱ्या वाहनांचे वेग कमी करण्यासाठी बाजारपेठेच्या चौका चौकात रस्त्याला गतिरोधक बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.

          पाली बाजारपेठेतील रस्त्याचे काम उत्तम प्रकारे झाले आहे परंतु यामुळे टूव्हीलर, फोरव्हीलर या गाड्या या बाजारपेठेतून अति वेगाने जात आहेत.यामुळे दोन-तीन वेळा किरकोळ अपघात झाला.यामुळे वेगाने जाणाऱ्या वाहनांवर नियंत्र ठेवण्यासाठी बाजारपेठेतील चौका-चौकात रस्त्याला गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी येथील  व्यापारी अंकित ओसवाल यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog