रामनवमी निमित्ताने महादेववाडी येथे अखंड हरीनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण
कोलाड (विश्वास निकम,रायगड भुषण)गुरुवर्य वै.ह.भ प.अलिबागकर महाराज, वै.ह.भ.प. गोपाळ बाबा वाजे,वै. ह.भ.प. धोंडू महाराज कोल्हाटकर,वै.ह.भ.प सिताराम दाजी खामकर महाराज,वै.ह.भ.प.बाबू मालू बाईत,वै.ह.भ.प. श्रीधर महाराज बाईत,यांच्या कृपाआशिर्वादाने रामनवमी निमित्ताने अखंड नाम यज्ञ सोहळा, ह.भ.प.नारायण दादा वाजे यांच्या कुशल मार्गदर्शनानुसार गुरुवार दि.३० मार्च २०२३ ते रविवार दि.२ एप्रिल २०२३ पर्यंत महादेववाडी अखंड हरिनाम सप्ताह व श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायणाचे आयोजन करण्यात येणार आहे.
यारे यारे लहान थोर l याती भलती नारी नर l करावा विचार l न लगे चिंता कोणाची ll
गेली ६० वर्षाची अखंड यशश्वि परंपरा राखत महादेववाडी येथे होणारा धार्मिक व अध्यात्मिक भक्तिमय सोहळा महादेववाडी गावानी जतन करुन ठेवला असून दररोज पहाटे ४ ते ६ काकड्याचे भजन, सकाळी ८.३० ते १२.३० व दुपारी ३ ते ५ वा.श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण,सायं. ५.३० ते ६.३० वा. प्रवचन,सायं.६.३० ते ७.३० हरिपाठ,९ ते ११ ते किर्तन व नंतर हरिजागरण होईल.
तसेच गुरुवार दि ३० मार्च २०२३ रोजी सकाळी ९ ते १२ )ह.भ.प.बबन महाराज वांजले (नारायणगाव ) यांचे राम जन्माचे किर्तन, रात्री ९ ते ११ ह.भ.प. नित्यानंद महाराज मांडवकर (चणेरा )यांचे किर्तन,शुक्रवार दि.३१मार्च २०२३ रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प.वैभव महाराज गाढवे (राजगुरू नगर,पुणे ) यांचे किर्तन,शनिवार दि.१एप्रिल २०२३ रोजी रात्री ९ ते ११ ह. भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील (धाटाव ) यांचे किर्तन, रविवार दि.२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ ते ११ ह.भ.प. विजयानंद महाराज तेलंगे (तळवली ) यांचे काल्याचे किर्तन, तसेच मृदूंग मणी चंद्रकांत बाईत, प्रसाद भऊर, ज्ञानेश्वर दळवी,गणेश सानप,लक्ष्मण मांडरे,तसेच गायनाचार्य रविंद्र मरवडे, सचिन तेलंगे, किरण ठाकूर, वैभव खांडेकर, नरेश दळवी, चंद्रकांत चोरगे, यांचे लाभणार असून सर्व कार्यक्रम यशश्विकरण्यासाठी नथुराम बाईत अध्यक्ष, धोंडू चितळकर उपाध्यक्ष, चंद्रकांत भऊर सचिव, शांताराम बाईत खजिनदार, पांडुरंग बाईत हिशेबतपासणीस,सुनिल भऊर तसेच समस्त ग्रामस्थ मंडळ, श्रीराम मित्रमंडळ, नवतरुण युवक मंडळ, महिला मंडळ महादेववाडी मेहनत घेत आहेत.
Comments
Post a Comment