Posts

Showing posts from March, 2026
Image
  कोलाड आंबेवाडी येथे सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीच्या वतीने श्रीराम नवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात,राम नवमीनिमित्त शोभायात्रा कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी नाक्यावर रामनवमीनिमित्त सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली.तर प्रभू श्री रामाच्या रामनवमी निमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात तसेच मोठ्या उत्साहात पार पडले. आंबेवाडी कोलाड येथील श्री अंबर सावत मंदिर सभागृहात हिंदू संमेलनाचे देखील आयोजन करण्यात आले होते. आंबेवाडी कोलाड बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत राम भक्तांच्या मोठ्या प्रमाणावर सहभागाने संपूर्ण बाजारपेठेतील वातावरण भगवेमय आणि भक्तिमय झाले होते. सकल हिंदू समाज कोलाड आंबेवाडी पंचक्रोशी राम भक्तांकडून रामनवमी उत्सवाचे हे आयोजन करण्यात होते याचा उपस्थित राम भक्तांनी आनंद लुटला. शोभायात्रेसाठी श्रीरामाच्या प्रतिमेसह आकर्षक सजवून आणलेल्या बैलगाडीने सारेजण गेले भारावून  रामनवमीसाठी रामभक्तांकडून बाजारपेठेतील रस्त्यांवर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी कणा रांगोळी व फुलांची सजावट कारण्यात आली होती. तस...
Image
         गोरेगाव येथील कालभैरव जत्रा उत्सवात उंच खांबावरील लाट फिरवणे ठरत आहे मुख्य आकर्षण, भिनाड गावाच्या काठीला मुख्य मान     कोलाड (विश्वास निकम )  चैत्र महिना सुरु झाल्यानंतर कोकणात जत्रेची धामधूम खऱ्या अर्थाने होते.याप्रमाणे सालाबाद प्रमाणे गोरेगाव येथील काल भैरवनाथ जत्रा अनेक वर्षांपासून सुरु आहे.यावर्षी कालभैरवनाथाची जत्रा चैत्र चतुर्दशी मंगळवार ३१ मार्च  २०२६ रोजी आहे या जत्रेचा विशिष्ट आकर्षण म्हणजे उंच खांबावरील लाट फिरवणे हे असुन  या जत्रेमधील विशिष्ट मानाची काठी म्हणून भिनाडच्या काठीचा मोठा मान सन्मान असतो.       भिनाड गावाच्या काठीच्या मानामागे फार मोठा जुना इतिहास असुन तो इतिहास पूर्वीपासून चालत आलेली  प्रथा आहे. पूर्वी गोरेगावातील कालभैरवनाथाच्या जत्रेत लाट फिरवण्याच्या वेळी काही वाईट शक्ती अडथळा करत होत्या. तो इतिहास पूर्वीपासून असा सांगितला जातो की गोरेगावातील लाट फिरवत्या वेळी जो अडथळा येत होता तो दूर करण्यासाठी गोरेगावातील जानकार मंडळींनी काही आत्मज्ञान असलेल्या लोकांकडे विचारणा केली असता असे स...
Image
  ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मोबाईल साक्षरता' प्रशिक्षण संपन्न; आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे,इंटरनॅशनल लोंजेव्हिटी सेंटर इंडियाचा उपक्रम. कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुका तसेच खांब विभागातील ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या ज्येष्ठ नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि त्यांना डिजिटल युगात सक्षम करावे, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था आणि आयएलसीआय (इंटरनॅशनल लोंजेव्हिटी सेंटर इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक ग्रुप ग्रामपंचायत कार्याल खांबच्या सभागृहात 'मोबाईल साक्षरता प्रशिक्षण' आयोजित करण्यात आले होते. याला येथील ज्येष्ठ नागरिकांना मोठा उत्सुर्त प्रतिसाद दिला. या महत्त्वाच्या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन सुप्रसिद्ध मार्गदर्शक सुशांत सोनावणे आणि नंदकुमार सकट यांनी केले. त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत आणि प्रात्यक्षिकांसह ज्येष्ठ नागरिकांना मोबाईलच्या विविध फिचर्सची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने व्हॉट्सअॅपचा वापर, सुरक्षित डिजिटल व्यवहार, ऑनलाइन सुरक्षितता आणि उपयुक्त अॅप्स कसे वापरावेत, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला गावांतील ज्येष्ठ नागरिका...
Image
  खांब पंचक्रोशीचा ६९ वे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सभा चिल्हे येथे मोठ्या उत्साहात संपन्न कोलाड (श्याम लोखंडे) कोकणात तसेच रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीची वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा लाभलेल्या या पंचक्रोशीतील यजमान श्री क्षेत्र चिल्हे येथे ९ मार्च ते १६ मार्च या कालावधीत गेली सात दिवस मोठ्या उत्साहात ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण, श्री संत तुकाराम महाराज गाथा भजन सोहळा तसेच जय जय राम कृष्ण हरीजागर मंत्र जप कीर्तन महोत्सव असे धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रम चिल्हे येथे मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सदरच्या अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि प्रवचनकार यांचे अलौकिक मार्गदर्शनातून मंत्रमुग्ध होऊन याचा भक्तिमय वातावरणात पंचक्रोशीसह उपस्थित सांप्रदायिक भक्तगणांनी श्रवण करत त्याचा आनंद लुटला.तर भक्तभावनेने संपन्न झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने याची सांगता सभा यजमान चिल्हे येथे शनिवारी २८ मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीचा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्...
Image
  मुंबई गोवा महामार्गांवर टेम्पोने घेतला पेट,  कोलाडच्या खांब गावा नजिक घटना, स्थानिकांच्या सतर्कमुळे मोठा अनर्थ टळला!  कोलाड (विश्वास निकम )  मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील खांब ग्रामपंचायती समोर ब्रिजवरुन गादी भरून जाणाऱ्या टेम्पोने अचानक पेट घेतला.असुन आजूबाजूच्या स्थानिक नागरिक यांनी धाव घेऊन प्रसंगवधान दाखवून  आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला असुन कोणतेही जिवीत हानी झाली नाही.   सोमवार दि.२३ मार्च २०२६ रोजी दुपारी १२. ४५ सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरून  खांब बाजुकडून कोलाड बाजूकडे गादी घेऊन जाणाऱ्या टेम्पो क्र. एम. एच ०४ के एफ १०५१  खांब ब्रिजवरून जात असतांना अचानक पेट घेतला. हे स्थानिक नागरिक व प्रवाशी वर्ग यांच्या लक्षात येताच त्यांनी घटना स्थळी धाव घेतली व प्रसंगवधान दाखवत आग आटोक्यात आणली व मोठा अनर्थ टळला.याची माहिती मिळताच रेक्यू टीम दाखल झाली परंतु तोपर्यंत स्थानिक नागरिक यांनी आग आटोक्यात आणली.
Image
  आजचा  महाराष्ट्र टॉप १० न्यूजचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा रायगड भूषण पुरस्कार देऊन केला सन्मान!    कोलाड (विश्वास निकम )  आजचा महाराष्ट्र टॉप १० न्यूज’ या वृत्तपत्राचा पहिला वर्धापन दिन सोहळा दिनांक २२ मार्च २०२६ रोजी रोहा नगरपरिषद येथील जेष्ठ नागरिक सभागृहात सकाळी ११ वाजता उत्साही वातावरणात संपन्न झाला.या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा रायगड भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, तसेच वृत्तपत्राच्या यशस्वी तीन वर्षांच्या प्रवासाचा गौरव करण्यात आला.    या कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते वृत्तपत्राच्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण १३ मान्यवरांना  पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये ११ ‘रायगड भूषण’ पुरस्कार, १ ‘बाळशास्त्री जांभेकर प्रेरणा पत्रकार भूषण पुरस्कार’ आणि १ ‘समाज भूषण’ पुरस्काराचा समावेश आहे.तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकार क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या  पत्रकारांचा" पत्रकार गौरव पुरस्का...
Image
  १० वर्षांची गुलामगिरी अन् दोन मुलींची तीन वर्षांची ताटातूट संपली!   सर्वहारा जन आंदोलनाच्या पाठपुराव्यामुळे  दोन मुलींची सुटका आई-वडिलांशी भेट   कोळसा मालक अनिल चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी! कोलाड (श्याम लोखंडे) गेल्या दहा वर्षांaपासून कोळसा भट्टीवर विटबिगारी करणाऱ्या वाघमारे कुटुंबाची अखेर छळातून सर्वहारा जनआंदोलनाच्या अथक पाठपुराव्यामुळे मुक्तता झाली असून, मालकाच्या ताब्यात असलेल्या मजुरांच्या दोन मुलींची तब्बल तीन वर्षांनंतर आई-वडिलांशी गळाभेट झाल्याचे समोर आले आहे. 'सर्वहारा जन आंदोलन' संघटनेने केलेल्या कायदेशीर पाठपुराव्यामुळे हे यश आले असल्याची माहिती संघटनेच्या प्रमुख व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्या मार्गदर्शाखाली संघटनेचे मुख्य पदाधिकारी सोपान सुतार यांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती मूळचे वरवटणे (ता. रोहा, जि. रायगड) येथील रहिवासी असलेले संतोष जानू वाघमारे आणि त्यांची पत्नी सुनीता वाघमारे यांना दहा वर्षांपूर्वी अनिल चव्हाण (रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याने कामासाठी कर्नाटक राज्यातील रायपूर येथे नेले होते. तेथे हे कुटुंब सतत ...
Image
  गॅस सिलेंडर तुटवडामुळे व्यवसायिकांवर परिणाम, हॉटेल्स, टपऱ्या बंद पडण्याच्या मार्गावर! कामगारांच्या नोकऱ्याही धोक्यात!   गॅसचा काळाबाजार तेजीत असल्याची चर्चा!   कोलाड ( विश्वास निकम) इराण इस्रायल युद्धामुळे होर्मूझची सामुद्रधूनी बंद झाली आहे. यामुळे भारताचा एलपीजी (LPG) पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे हॉटेल्स,टपऱ्या आणि खाद्यपदार्थ टॉल्स बंद पडत असून व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे यामुळे हॉटेल व्यावसायिकांवर हॉटेल बंद करण्याची वेळ आली. यामुळे कामगारांचे नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.             इराण इस्रायल युद्धामुळे हकाती देशातून होणारा गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल्स व टपऱ्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.तसेच सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे काळ्या बाजारात गॅस आवाच्या सव्वा किमतीने विकला जात आहे.तर तर गॅस महाग व दुर्मिळ  झाल्यामुळे चुलीचा किंवा लाकडाचा वापर करत आहेत. यामुळे लाकडाची मागणी वाढली आहे.तर चुलीवर मेनू ब...
Image
रोहा येथे गरुड झेप फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न    जनतेचा उदंड प्रतिसाद! रोहा (प्रतिनिधी ) हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रोहा येथे गरुड झेप फाउंडेशनच्या वतीने 22 मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  हिंदू हृदय सम्राट  बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरुड झेप फाउंडेशन तर्फे 13 वे रक्तदान शिबिर मातोश्री मंगल कार्यालय रोहा येथे संपन्न झाले यावेळी साठ रक्त पिशव्या जमा करण्यात आल्या गरुड झेप संस्थेचे अध्यक्ष दुर्गेश नाडकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले त्यांना सहकार्य यतीन धुमाळ, दत्ता साळुंखे, दिप्रेश सावंत, प्रणय मोहिते, केदार आंब्रे, दीपक तेंडुलकर, भूषण देशपांडे,विनोद सावंत, राजकुमार विश्वकर्मा आदी कार्यकर्त्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.  सदर शिबिरास महाराष्ट्र शासनाच्या राज्य रक्त संक्रमण परिषद अलिबाग या रक्तपेढीमध्ये हे रक्त जमा करण्यात आले.    सदरील शिबिर बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 23जानेवारीला करण्यात येते ...
Image
  खांब पंचक्रोशीचा ६९ वे अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र चिल्हे येथे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांच्या सेवेने मोठ्या उत्साहात संपन्न! कोलाड (श्याम लोखंडे ) कोकणात तसेच रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीची वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा लाभलेल्या पंचक्रोशीतील यजमान श्री क्षेत्र चिल्हे येथे ९ मार्च ते १६ मार्च या कालावधीत गेली सात दिवस चालत असलेला हा हरीनाम ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण सोहळा जय जय राम कृष्ण हरी मंत्र जप कीर्तन महोत्सव चिल्हे येथे मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सदरच्या अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि प्रवचनकार यांचे अलौकिक मार्गदर्शनातून मंत्रमुग्ध होऊन याचा भक्तिमय वातावरणात उपस्थित सांप्रदायिक भक्तगणांनी श्रवण करत आनंद लुटला. रोहा तालुक्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्यात वारकरी संप्रदायाचा वारसा जतन करत असलेल्या खांब पंचक्रोशीचा ६९ वे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवारी १६ मार्च रोजी खांब पंचक्रोशीचे वैभव तथा आधिस्थान रायगड भूषण विद्या वाचस्पती डॉ.हभप मारुती महाराज कोलाटकर यांच...
Image
  केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेत नंदकुमार तेलंगे रायगड मध्ये प्रथम तर राज्यात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण!       कोलाड :(विश्वास निकम)  रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद केंदशाळा कोलाड येथे कार्यरत असणारे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक नंदकुमार अविनाश तेलंगे यांनी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख )विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेत रायगड जिल्ह्यात प्रथम तर राज्यात तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले.            ३ जानेवारी २०२६ रोजी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख )विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.याचा निकाल १४ मार्च २०२६ लागला असुन प्राईम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया (पीएमश्री )राजिप केंद्रशाळा कोलाड येथील शिक्षक नंदकुमार अविनाश तेलंगे यांनी केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा  परीक्षेत २०० पैकी १६९गुण प्राप्त करून रायगड जिल्ह्यात प्रथम तर राज्यात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.           या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून ४६०६८ जणांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले होते या...
Image
  रोहा चिल्हे येथे उसळला भक्तीच्या नामाचा गजर! अखंड हरिनाम सप्ताहात तल्लीन  खांब पंचक्रोशीत अवतरली धाकटी पंढरी!    कोलाड (विश्वास निकम ) वारकरी संप्रदायी परंपरा लाभलेल्या श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीचा ६९ वे अखंड हरिनाम सप्ताह रोहा तालुक्यातील चिल्हे ग्रामस्थांच्या सहकाऱ्याने मोठ्या उत्साही आणि आनंददायी वातावरणात साजरा होत असल्याने गावात अखंड हरिनाम सप्ताहात जणू भक्तीचा गजर उसळला असल्याने खांब पंचक्रोशी भक्तिमय झाली असून धाकटी पंढरी अवतरली आहे.भक्तीच्या रसात तल्लीन होऊन याचा आनंद लुटत आहेत. कोकण वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान वै.सद्गुरू गुरुवर्य गणपत बाबा गुडेकर (अलिबागकर) महाराज, वै.गुरुवर्य गोपाळ बाबा वाजे, वै.गुरुवर्य धोंडू बाबा कोलाटकर, यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या तसेच संत परंपरा लाभलेल्या खांब पंचक्रोशीत श्री तीर्थक्षेत्र चिल्हे येथे नारायणदादा अलिबागकर वाजे मठाधिपती पंढरपूर,दत्तू महाराज कोलाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खांब पंचक्रोशीचे वैभव विद्या वाचस्पती रायगड भूषण डॉ.मारुती महाराज कोलाटकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत असलेल्या कार्यक्रमात ...
Image
  माणगांव पंचायत समितीवर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा झेंडा   सभापती पदी विलास शिंदे तर उपसभापती पदी मनिषा मालोरे यांची बिनविरोध निवड  कोलाड (विश्वास निकम)   माणगांव पंचायत समितीवर शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा झेंडा फडकला असून सभापतीपदी शिवसेनेचे विलास यशवंत शिंदे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा संदेश मालोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे माणगाव पंचायत समितीत महायुतीचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे    माणगाव पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडली होती. या निवडणुकीत एकूण ८ पैकी ५ जागांवर शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे पंचायत समितीवर शिवसेनेचे संख्याबळ सर्वाधिक राहिले. राज्यात महायुतीची सत्ता असल्याने माणगाव पंचायत समितीतही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत सभापती व उपसभापती पदाची निवडणूक लढवली.    सभापती व उपसभापती पदासाठीची निवड प्रक्रिया बुधवार दि. ११ मार्च २०२६ रोजी पंचायत समिती माणगाव येथील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माध...
Image
  रायगड जिल्ह्यातील घटना! रोहा तालुक्यात पहूर वाळंजवाडी गोमाशी डोंगरावर गड संवर्धन मोहिमेतून सापडले ऐतिहासिक अवशेष,   दोन वर्षाच्या भटकंती व शोध मोहिमेतून ऐतिहासिक ठेव्याचा उलगडा! तालुक्यात पाचवा किल्ला म्हणून याची नोंद घ्यावी, शिवप्रेमींची मागणी!  न्यूज आज तक मराठीची टीम गोमाशी डोंगरावर  दाखल!   छायाचित्र:- ओम पवार रायगड  रोहा :-(श्याम लोखंडे) शिव छत्रपतींच्या रायगडच्या राजधानीत तसेच रोहा तालुक्यातील वाळंजवाडी पहूर येथील पूर्वीच्या काळातील ओळखला जाणारा तसेच केदार जननी मातेच्या पहाडी कड्यालागत असलेल्या गोमाशी डोंगरावर गड संवर्धन मोहिमेतून गड संवर्धन करणाऱ्या शिवप्रेमीना सापडल्या शिवकालीन ऐतिहासिक सापडले अवशेष त्यामुळे येथे पूर्वीचा ऐतिहासिक गड किल्लाच असल्याचे म्हटले जात आहे तर येथे हे शिवप्रेमी मागील दोन वर्ष या डोंगर परीसरात भटकंती आणि संवर्धन मोहिमेतून काम करतात या माध्यमातून या ठिकाणी त्यांना वरती काही ठिकाणी पाण्याचे टाकं तसेच गडाला असल्यासारखे तटबंदी जोथे ऐतिहासिक चिरे, कौलांचे आणि मातीच्या मडक्यांचे तसेच माती विटांचे अवशेष सापडले आहेत त्यामुळे या ऐति...