शिमगो रंगलो गो लाले लाल, कोलाड ,सुतारवाडी,खांब, विभागात होळी उत्सव धुलेटीला मंगळवार बोकड मटणाच्या पोस्ताचा आस्वाद एक दिवस लांबणीवर,

    कोलाड  (श्याम लोखंडे ) कोकणात शिमगा    उत्सव व होळी उत्सवाला मोठा महत्व असून रोहा तालुक्यातील कोलाड, सुतारवाडी,खांब, विभागात शिमगोत्सव मोट्या उत्साह वातावरणात साजरा करण्यात आला तसेच हवामनाच्या आनंदाजा नुसार रात्री अचानक ढगाळ वातावरण व वारा तसेच विजांचा कडकडाट सुरु झाल्याने काही ठिकाणी लवकर तर काही ठिकाणी उशिरापर्यंत होळींचे दहन करण्यात आले तर युवक मंडळानी काही विविध खेळांचे आयोजन केले होते तर त्यांचे मोठे या खराब हवामणामुळे व विजांच्या कडकडाटमुळे पूर्णतः त्यांची नाराजी झाल्याचे सर्वत्र ऐकवयास मिळत होते . सण हाय होळीचा सण हाय रंग पंचमीचा त्यामुळे शिमगो रंगला गो रंगला लाले लाल अशी लहान बालगोपालांकडून होळी रे होळी पूर्णाची पोळी म्हणत रंगाची उधळण मंगळवारी दिवसभर होत होती त्यात सोमवारी आली होळी व धुलेटीला मंगळवार त्यामुळे खवय्यांचा चिकन,बोकडाच्या मटणाचा खमंग पोस्त हा एकदिवसांनी लांबला त्यामुळे धुलेटी साजरी करणारे तळीराम देखील  वेटिंगवर मात्र उद्याच बुधवार आल्याने बोकडं शोधण्यांच्या तयारीत खवय्ये तर  आज रात्रीपासून पोस्तांच्या तयारीला लागत  बुधवारी सकाळच्या न्याहरीलाच तयार असे काही ठीक ठिकाणी दिसून येत असून आज बुधवार असल्याने काही ठिकाणी चिकन मटण दुकात रांगा च्या रांगा दिसून येणार

कोलाड परिसरात तसेच  कोलाड पोलीस थाने परिसरातील एकूण सार्वजनिक ९७ व खाजगी ०८ आशा एकूण १०५ होळींचे पूजन करत शांततेत मोठ्या उत्साहात दहन करत हा उत्सव साजरा झाला .तालुक्यातील कोलाड परिसरातील कोलाड,पुई,आंबेवाडी,संभे,वरसगाव,तिसे,चिंचवली तर्फे दिवाळी,सुतारवाडी परिसरात येरल, जामगाव, पहूर, कुडली,नेहरू नगर,खांब विभागातील खांब, पुगाव, गोवे,ऐनवहाल,विठ्ठलवाडी गारभट,तळवली तर्फे अष्टमी,या प्रमुख ग्राम पंचायत हद्दीतील गावांमध्ये गाववस्ती सह अन्य आदिवासी वाड्यांवर हा उत्सव कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करून येथील ग्रामस्थांनी साजरा केला,मराठी महिन्याचा शेवटचा व अखेरचा समजला जाणारा सण म्हणजे फाल्गुन महिन्यातील होळी उत्सव आणि हा होळीसन कोकणात मोट्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो या निमित्ताने होळी,धुळवड,आणि धार्मिक व अत्यन्त सर्व शुभ कार्यक्रमांसाठी समजली जाणारी रंग पंचमी उत्सव म्हणून आनंदाने साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर हा उत्सव सर्वत्र शांततेत व आनंदाने साजरा करण्यात आला.

स्वा.सु. नि.गुरुवर्य सद्गुरू अलिबागकर महाराज गुरुवर्य गोपाळ महाराज वाजे गुरुवर्य धोंडू महाराज कोल्हटकर यांचा वारसा लाभलेल्या व त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खांब पंचक्रोशीत हा उत्सव अतिशय आनंदाने व एकत्रीत येऊन गावागावात साजरा करतात आध्यत्मिक आणि धार्मिक , परंपरेचा वारसा लाभलेली खांब पंचक्रोशी तसेच या कालावधीतच श्री संत तुकाराम महाराज यांचा बीजोत्सव साजरा होत असलेल्या आनंदमयी उत्साही वातावरणात धार्मिक आणी अध्यात्मिक विचारांनी साजरा करण्यात येतो.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यानी या उत्सवाबद्दल व रंग पंचमी बाबत कित्येक वर्षांपूर्वी म्हटले आहे,दैन्य दुःख आम्हा न येती जवळी l दहन हे होळी होती दोष ll १ ll सर्व सुख येती माने लोटांगणी l कोण आणि त्यासी दृष्टी पुढे ll२ll आमचे मागणे मागू त्यांची सेवा l मोक्षाची नि दैवा कोणा चाड ll३ll आमुची आवडी संत समागम l आणिक त्या नाम विठोबाचे ll ४ll तुका म्हणे पोटी साठवला देव l न्यून्य हा भाव कोण आम्हा ll ५ ll 

संत तुकाराम महाराज म्हणतात की श्री हरीच्या सततच्या चिंतनाने व नामस्मरणाने आयुष्यातील दैन्य दुःख आमच्या जवळ देखील येत नाहीत किंबहुना आमच्या सावलीला देखील उभे राहत नाहीत एवढेच नव्हे तर नामाने, त्याच्या सततच्या उच्चाराने आमच्यातील दोष व अवगुणांची होळी होऊन आमच्या ठिकाणी असलेल्या पापांचेदेखील संपूर्णपणे दहन झाले आहे. ते पुढे म्हणतात एवढेच नव्हे तर मनुष्याला इच्छित अशी सर्व सुखे व ती देखील मानाने आमच्यापुढे आमच्या दिमतीला येऊन उभी ठाकतात परंतु त्यांच्याकडे देखील आम्ही ढुंकून पाहत नाही. कारण ते म्हणतात आमची आता एकच आवड राहिली आहे, एकच इच्छा बाकी आहे आणि ती म्हणजे संतसमागमाची, त्यांच्या संगतीची, त्यांच्या सानिध्यात राहण्याची व त्यांच्या जोडीने विठ्ठलाचे नाम घेण्याची.

तुकोबाराय शेवटी म्हणतात की आम्ही आमच्या पोटीच देव साठविला असल्यामुळे आम्हाला सर्व गवसल्या सारखेच झाले आहे त्यामुळे आमच्यापाशी काही नाही अशी भावना देखील आमच्या मनी येत नाही किंबहुना न्यूनगंडाचा भाव आम्हांला शिवत देखील नाही.आध्यत्मिक आणि धार्मिक विचारांचा वारसा लाभलेल्या खांब पंचक्रोशी व खांब देवकान्हे विभागात शिमगा होळी उत्सव मोट्या आनंद वातावरणात साजरा करण्यात आला.

तसेच  कोलाड पोलीस ठाण्या हद्दीत ६ मार्च रोजी सार्वजनिक ९७ व खाजगी ०८ होळी पूजन व दहन करण्यात आले या प्रसंगी कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता कोणताही वाद विवाद न होता तसेच काही खराब हवामानामुले होळीचे दहन उशीराने करण्यात आले परंतु अतिशय शांत वातावरणात होळी दहन करण्यात आले सदरवेळी हद्दीत योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आले होते वरील ठिकाणी रात्रौ 12 वाजण्या पूर्वी सर्व होलिकांचे दहन करण्यात आले.तसेच मुबंई गोवा महामार्गावर तळ कोकणात जाणाऱ्या वाहनांची वाहतूक गर्दी तसेच कोंडी दि.०४ मार्च या तारखेपासून होत होती या करिता योग्य वाहतूक व्यवस्था करण्यात आली असल्याचे कोलाड पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी माहिती दिली आहे.

Comments

Popular posts from this blog