रोहा खारी येथील लक्ष्मीबाई म्हस्के यांचे निधन
रोहा (विशेष प्रतिनिधी ) रोहा तालुक्यातील खारगाव ग्रामपंचायत हद्दीतील मौजे खारी-काजुवाडी(दामाणी नगर) येथील लक्ष्मीबाई रघुनाथ म्हस्के यांचे बुधवार दि. २२ डिसेंबर २०२१ रोजी वयोवृध्द काळाने व अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले.
सर्वांना सुपरिचित असणारे पत्रकार केशव म्हस्के यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई यांच्या निधनाची वार्ता समजताच रोहा-आरे दशक्रोशीतील त्यांचे नातलग व विविध स्तरातील समाज बांधव त्यांच्या अंत विधीसाठी जमले होते. सर्वांच्या परोपकारी पडणाऱ्या लक्ष्मीबाई यांचे अचानक निधन झाल्याने म्हस्के परिवारावर दुःखाचे डोंगर तर परिसरात शोककला पसरली असून मोठी पोकळी निर्माण झाली तसेच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुलगे,तीन मुली,सूना, जावई,नातवंडे,पतवांडे असा मोठा म्हस्के परिवार आहे. त्यांचे दशक्रियाविधी शुक्रवार दि.३१ डिसेंबर रोजी सकाळी ०९:०० ते ११:०० वाजेपर्यंत स्वयंभू श्री शिवालय मंदिर काजुवाडी येथे होतील. तर अंतिम धार्मिक विधी बारावे रविवार दि.०२ जानेवारी २०२२ रोजी त्यांच्या राहत्या निवस्थानी खांब पंचक्रोशीचे वैभव तथा मार्गदर्शक तसेच अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे कार्यकारी रायगड भूषण ह.भ.प.मारुती महाराज कोलाटकर (तळवली तर्फे अष्टमी) यांची किर्तनसेवा सकाळी १०:०० ते १२:०० या वेळेत श्रद्धांजली पर सेवा करत त्यांना धार्मिक तथा आध्यत्मिक भावनेतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत संपन्न होत आहेत.
Comments
Post a Comment