रोहा दत्तनगर येथे दत्त जयंती उत्सव उत्सहात संपन्न!
हजारो भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ,
रोहा (विशेष प्रतिनिधी)रोहा येथील भुवनेश्वर येथील दत्त नगर येथे दत्त जयंती उत्सव मोठया उत्सहात साजरा करण्यात आला हजारो लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रोहा येथील दानशूर व्यक्तिमत्व व सामाजिक कार्यकर्ते रामप्रकाश कुशवाह यांचे भुवनेश्वर येथील दत्तमंदिरात सालाबाद प्रमाणे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून हजारो दत्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
वेळी उत्सवमूर्ती रामप्रकाश कुशवाहा आणि त्यांचे कुटुंबीय जातीने सर्व भक्तांचे स्वागत करत होते.आज दत्त भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता दत्त नामाच्या मधुर भजनात सारा आसमंत भरून गेला होता आबाल वृद्ध साऱ्यांनी या उत्सवाला उपस्थित राहून अनेक वर्षे होत असलेल्या उत्सवाला नवे रंग रूप दिले. होते यावेळी अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांची पसंती असलेल्या न्यूज आज तक मराठी चॅनेलचे उपसंपादक राजेश हजारे यांनी ही दत्त मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले.
Comments
Post a Comment