रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन      सुतारवाडी : दि. 26 ( हरिश्चंद्र महाडिक ) रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आकर्षक कॅलेंडर प्रकाशित करण्यात आले. गेल्या बारा वर्षापासून नियमितपणे समाज बांधव दिनदर्शिका प्रकाशित करत आहेत. अध्यक्ष श्री. भालचंद्र रहाटे, कार्याध्यक्ष श्री. शांताराम दळवी, सचिव श्री. राजन रहाटे, खजिनदार श्री. संतोष रहाटे, उपाध्यक्ष श्री. विनायक तार्लेकर, उपाध्यक्ष श्री. रविंद्र निगडे , उपसचिव श्री. देवेंद्र राऊत, श्री. मोहन जाधव आणि नितीन जाधव, उप खजिनदार उत्तम निगडे, उपकार्याध्यक्ष रुपेश रहाटे कार्यालय प्रमुख श्री. तुकाराम जाधव, हिशोब तपासणीस श्री. संतोष दळवी, उपहिशोब तपासणीस श्री. अनिल उबाळे या पुरुष कमिटीने तसेच महिला अध्यक्षा सौ. सुरेखा देशमाने, कार्याध्यक्षा श्रद्धा महाडिक, सचिव सौ. भावना रहाटे, खजिनदार सौ सोनाली लांजेकर, सदस्या सर्वस्वी सौ. साक्षी उबाले, सौ. रोहिणी महाडिक, सौ. सीमा रहाटे, सौ. नेहा रहाटे, सौ. पुजा दळवी, सौ. अश्विनी रहाटे, सौ. सुजाता काळे, सौ. सुनिता जाधव, सौ. सुषमा रसाळ, सौ. सुलोचना रहाटे त्याच प्रमाणे सल्लागार श्री. रत्नाकर महाडिक, श्री. गजाजन शिंदे, श्री. विश्वनाथ तार्लेकर, श्री. श्याम घोडके, श्री. राजाराम जाधव तसेच सर्व सदस्य यांनी विशेष मेहनत घेवून या वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित केली.

     या दिनदर्शिकेचे वाटप दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रायगड जिल्हयातील सर्व समाज बांधवांना तसेच अन्य जिल्हयातील समाज बांधवांना त्यांच्या घरी जावून दिनदर्शिका सम्मान पूर्वक दिल्या.

      रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्थेमार्फत विविध उपक्रम समाज बांधवांसाठी राबवतात. या वर्षी कोकणातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ही केले गेले. 


Comments

Popular posts from this blog