रोहा -अष्टमी शहरावर पाणीबाणी!

          पिण्याच्या पाण्यासाठी रोहेकरांची फरपट ! 

चार दिवस झाले शहराचा पाणीपुरवठा बंद!

नगरपरिषद प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका!

कोलाड (श्याम लोखंडे) पिण्याच्या पाण्यासाठी रोहा अष्टमीकरांची गेली चार दिवस फरपट सुरू आहे. चार दिवस झाले शहरात पाण्याचा टिपूस नाही, लोक पाण्यासाठी वणवण करीत आहेत, शुक्रवार पासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला तरी तो अपुरा असल्याने नगरपरिषद प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका नागरीकांना बसला आहे.

वीस हजारांची लोकसंख्या असलेल्या रोहा शहराच्या कानाकोपऱ्यात गेल्या चार दिवसांपासून पाण्याचा टिपूस नाही. नगरपरिषद प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शहरवासीयांना हंडाभर पाण्यासाठी अक्षरशः खेडोपाड्यात फरफट करावी लागत आहे. प्रशासनाकडून पुरवठा केले जाणारे पाण्याचे टँकर अपुरे पडत असल्याने अनेक भागातील नागरिकांना आंघोळीसाठी अक्षरशः 'गोळी' घेण्याची वेळ आली आहे. आणखीन दोन दिवस भगदाड पडलेली जलवाहिनी दुरुस्ती करण्यास वेळ लागणार असल्याने रोहा शहरावर पाणीबाणी ओढवली आहे.


रोहा हे तालुक्याचे ठिकाण असून या शहराला डोलवहाल धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या धरणातून टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या जुनाट झाल्याने नवीन लाईन टाकण्याचे साडेतेरा कोटीं खर्च करून नव्याने काम करण्यात आले. या नव्याने करण्यात आलेली जलवाहिनी वारंवार नादुरुस्त होत असून अधून मधून यावाहिनीला भगदाड पडते. त्याच बरोबर दुरुस्तीच्या नावाखाली प्रशासन या जलवाहिन्यांवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करत आहेत. चार दिवसांपूर्वी ही पाईपलाईन फुटली असून शटडाऊन साठी बंद करण्यात आली आहे. मात्र यामुळे अख्ख्या शहरात खडखडाट झाला असून नागरिकांना आजूबाजूच्या गावांमधून तसेच अन्य ठिकाणांहून पाणी विकत घ्यावे लागत आहे. नगरपालिका नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करत असली तरी लोकसंख्येच्या तुलनेत हे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे अनेकांना अक्षरशः आंघोळी वाचून चार दिवस काढावे लागले आहेत.

 शिवसेनेचा टँकरद्वारे पाणीपुरवठा:- समीर शेडगे   शिवसेना तालुकाप्रमुख रोहा,

नागरिकांवर ओढवलेल्या पाणीबाणी या संकटात रोहा शिवसेनेकडून स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दररोज दहा टँकर नागरिकांसाठी तैनात केले असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी प्रतिक्रिया दिली.

जलवाहिन्यांच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांचा चुराडा करण्याऐवजी पूर्णतः नवीन जलवाहिनी टाकली गेली असती तर आज रोहेकरांवर पाण्याची आणीबाणी ओढवली नसती. नागरिकांना पाण्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी पालिका प्रशासनाला आमचा पूर्ण सहकार्य आहे.

 दयानंद गोरे मुख्याधिकारी, रोहा नगर परिषद:- जलवाहिनीचे सुरू असलेला काम शनिवारी रात्रीपर्यंत पूर्ण करण्यात येईल, रात्री उशिरा अथवा रविवारी सकाळी नागरिकांना पाणि उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. अशी माहिती दयानंद गोरे -मुख्याधिकारी, रोहा नगर परिषदयांनी दिली.


Comments

Popular posts from this blog