सोनाजी भाऊ दळवी यांचे अल्पशा आजाराने निधन
गोवे -कोलाड विश्वास निकम आंबेवाडी नाका कोलाड येथील रहिवासी सोनाजी भाऊ दळवी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी १५ डिसेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. विद्युत वितरण कंपनी मधून ते सेवानिवृत्त झाले होते.आपल्या सेवा काळात त्यांनी रोहा सह रायगड जिल्यातील बहुतांश तालुक्यामध्ये त्यांनी आपली सेवा उत्तमपणे बजावली. सेवानिवृत्ती नंतर ते कोलाड जेष्ठ नागरिक मंडळात कार्यरत होते.त्यांचे अंत्यविधी प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्यासंख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाचे , सुना नातवंडे मोठा कदम परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार २४ डिसेंबर रोजी उद्धर रामेश्वर येथे करण्यात येणार आहे. तर उत्तरकार्य रविवार २६ डिसेंबर रोजी आंबेवाडी नाका कोलाड येथील त्यांचे राहत्या घरी होणार असल्याचे माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
Comments
Post a Comment