सुतारवाडी येथे दत्तजयंती सोहळा उत्साहात पंचक्रोशितील भक्तांनी दर्शन आणि प्रसादाचा घेतला लाभ 



 सुतारवाडी (हरिश्चंद्र महाडिक) सुतारवाडी येथील श्री दत्तमंदिरात गेल्या पस्तीस वर्षापासून दत्तजन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तीभावाने आणि आनंदमय वातावरणात साजरा केला जातो. या वर्षी 36 व्या वर्षात उत्सवाने पदार्पण केले. दि. 18 डिसें. 2021 रोजी अभ्यंग स्नान श्री. विजय सावंत ( सुतारवाडी ) यांच्या हस्ते करण्यात आले. नेतृत्व ह.भ.प. किरण कुंभार, ह.भ.पू. श्री. श्रीकांत सरफळे महाराज यांनी केले. यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण करण्यात आले याचे नेतृत्व श्री. मोहन दोशी, श्री. विजय सावंत, श्री. श्रीकांत सरफळे यांनी केले. 




    ज्ञानेश्वरी सांगता श्री. रमेश सुर्वे यांनी केली. दुपारी 12 नंतर भोजनाचा आस्वाद भाविकांनी घेतला. हे भोजन श्री. दिलीप जांभळे व कै सुनंदा नथूराम मेहता यांच्या स्मरणार्थ श्री. विनोद मेहता यांनी दिले. दुपारी 3 ते 5 वा. द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडी आणि रा.जि.प. प्राथमिक शाळा सुतारवाडी च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये गजानना, गजानना, परिकथेच्या पऱ्या, चिऊताई चिऊताई अंगणात ये, पार्वतीका नंदननाचे, बम बम बोले, बुरुम बुरुम, सुया घे पोत घे, चटक मटक साकी साकी रे, अगोबाई ढगूबाई वेसावची पारु, आय मी येते ग, पिंगा ग पोरी पिंगा, नवरा पाहिजे गोरा, बाबा मै तेरी मलिका , भाव माना सम्राट, आई तुझ देऊळ बळी राजाचे राज्य अशी दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आली.  

               सायंकाळी 5 ते 7 या वेळेत नारायणगाव येथील ह.भ.प. बबन वांजळे महाराज यांचे दत्त जन्माचे किर्तन झाले. या वेळी मृदूंग मणी म्हणून श्री. मनोहर महाडेश्वर, श्री. दत्ताराम तेलंगे यांनी सहकार्य केले तर किर्तनाला साथ ग्रामस्थ मंडळी धगडवाडी , कुडली विभाग, श्री. पद्ममनाभाचार्य सांप्रदाय, संदेश खेरटकर, चेतन ओमले विणाधारक, श्री. विजय सावंत यांनी सहकार्य केले. रात्री 7 ते 8 या वेळेत प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला या मध्ये अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश होता. दि. 18 डिसें. 2021 रोजी सकाळी 10 वा. खासदार सुनिल तटकरे तसेच त्यांची पत्नी सौ. वरदा सुनिल तटकरे यांनी दत्तमंदिरामध्ये येऊन श्री. दत्ताचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. येथील भक्तीमय वातावरण पाहुन खासदार मा. सुनिल तटकरे आणि सौ. वरदा तटकरे यांनी समाधान व्यक्त केले. 

              रविवार दि. 19 डिसें. 2021 रोजी सकाळी 6 ते 11 या वेळेत श्री दत्तपालखी संपूर्ण सुतारवाडी गावामध्ये फिरविण्यात आली. या वेळी प्रत्येक घरासमोर पालखी आल्यानंतर भाविकांनी दर्शन घेतले. पालखीचे नेतृत्व ह. भ. प. श्रीकांत सरफळे, ह. भ. प. केशव मोरे ( येरळ ), राम खेडेकर तसेच सुतारवाडी ग्रामस्थ, ज्ञानेश्वर सत्संग सेवा मंडळ रोहा यांनी केले. मृदुगमणी म्हणून श्री. दत्ताराम तेलंगे यांनी सहकार्य केले. सकाळी 11 ते 12 या दरम्यान, काल्याचे किर्तन श्री. ह. भ. प. श्रीकांत सरफळे (प्रणव स्वामी) यांनी केले. या वेळी आलेल्या भाविकांचा सुतारवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.      

               रात्री 9 ते 12 ह. भ. प. मारुती कोल्हाटकर महाराज यांचे जागराचे , किर्तन झाले . या वेळी श्रीसद्गुरु पद्ममनाभाचार्य शिष्य सांप्रदाय अमृतनाथ स्वामी शाखा दत्तमंदिर पुगाव, कुडली विभाग - भगवान महाडिक, संजय पडवळ, भगवान तवटे, बबन तवटे, घनश्याम सावळे, महादेव वांजळे, धोंडू चव्हाण, प्रशांत जोरकर, किसन जोरकर, बबन गुजर, रमेश जाधव, निळकंठ कदम, परशुराम पडवळ, सुंदर सरफळे, श्रीकांत सरफळे यांनी साथ दिली . 

                रात्री 12 ते पहाटे 4 ग्रामस्थ मंडळ सुतारवाडी यांचे जागरण, सकाळी 4 ते 6 काकडा नेतृत्व श्री. नारायण महाराज दहिंबेकर, व्ही. एस. सानप, श्री अनंत सानप, श्री. दत्ताराम तेलंगे, श्री. राम खेडेकर, श्री. श्रीकांत सरफळे व ग्रामस्थ मंडळ सुतारवाडी यावेळी नेतृत्व श्री. ह.भ. प. दहिंबेकर, पांडुरंग सानप, विलास पवार, नितीन सानप, विलास दहिंबेकर, अजय तेलंगे, किरण ठाकूर, अनंत सानप, दत्ता तेलंगे आणि सर्व महिला मंडळ सुतारवाडी यांनी केले. कार्यक्रमाचे डेकोरेटर्स सोनिया साउंड सर्विस चे संदिप खेळू चिविलकर यांनी उत्तम केले. 

              दोन दिवस दत्तजन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी गावचे अध्यक्ष श्री. नथुराम साळवी, उपाध्यक्ष श्री. संदेश नाकती, सेक्रेटरी श्री. अधिकराव शेलार, खजिनदार श्री. दिलीप नवशे, हिशोब तपासणीस बाळाराम गुरव, ग्रामस्थ मंडळ सुतारवाडी, श्री दत्त क्रीडा समाजसेवा मंडळ व महिला मंडळ सुतारवाडी, तरुण मुलं - मुली, जेष्ठ नागरिक त्याचप्रमाणे दुरटोली पंचक्रोशि सुतारवाडी ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेवून दत्तजयंती उत्सव भक्तीमय वातावरणात सपन्न झाला.




  दत्त जयंतीच्या दिवशी सुतारवाडी येथील श्री दत्तमंदिराला खासदार सुनिल तटकरे आणि सौ. वरदाताई तटकरे यांनी दर्शन घेतल्यानंतर ग्रामस्थांनी उभयतांचा सत्कार केला (छाया हरिश्चंद्र महाडिक सुतारवाडी )



Comments

Popular posts from this blog