पनवेल येथे वीरशैव लिंगायत समाजाचा वधूवर मेळावा

. गोवे-कोलाड (विश्वास निकम )महाराष्ट्र वीरशैव सभा रायगड जिल्हा च्या वतीने २ जानेवारी रोजी कर्नाटक संघ हॉल शबरी हॉटेल समोर सेक्टर २ न्युज पनवेल येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वधुवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष महेंद्र बोडके यांनी दिली आहे.

पनवेल येथे हा मेळावा सकाळी ११ वाजता सुरु होणार असून या मेळाव्यासाठी वीरशैव समाजातील जाती,पोटजाती व जंगम समाजातील बंधु भगिनींनी आपल्या उपवर मुला मुलींसोबत हजर रहाण्याचेआवाहन करण्यात आले आहे.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष महेंद्र बोडके, मार्गदर्शक हेमंत डोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष एस.एम.बिराजदार,सचिव नितीन वाणी, महीला संघटक रेखा कोरे,वधुवर मंडळ संघटक मंगला बिराजदार, कोषाध्यक्ष चंद्रकांत शिवपुजे, सहसचिव रमेश पाटील,युवा संघटक शैलेंद्र अक्कलकोटे यासह पदाधिकारी परीश्रम घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog