रोहा कृषीधिकारी महादेव करे यांच्या शुभहस्ते बाहे येथे कृषी दिनदर्शिका २०२२ प्रकाशनकोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानचा पाचवा वर्धापनदिन ३० डिसेंबर रोजी मौजे बाहे येथे साजरा करण्यात आला याचे औचित्य साधून त्या निमित्ताने २०२२ या सालाचे दिनदर्शिका रोहा तालुका कृषिधिकारी महादेव करे यांच्या शुभहस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन मोठ्या उत्साह व आनंददायी वातावरणात करण्यात आले .

रोहा तालुक्यातील भाजी पाला व्यवसायात प्रगतीपथावर असलेले गाव बाहे येथील प्रगतिशील शेतकरी जगदीश थिटे यांनी विविध प्रकारची भाजी लागवड व केलेल्या फळबागायत व निसर्गरम्य शेतात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.प्रसंगी यावेळी प्रमुख मार्गदर्शक तथा तालुका कृषीधिकारी महादेव करे , कृषी तालुका विभागिय अधिकारी सुतार, नैसर्गिक शेती मार्गदर्शन धनंजय जोशी शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भगत,सह आदी मान्यवर व शेतकरी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी तसेच बहुसंख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता.

यावेळी प्रमुख मान्यवर व मार्गदर्शक रोहा कृषी अधिकारी महादेव करे यांनी अंतर्गत पिके व गटात केलेल्या शेतीचे फायदे कसे असतात याबाबत माहिती करून दिली तसेच कोरोना,काळात व लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीबाबत खंत व्यक्त करून शेतकऱ्यांनी खचून न जाता या पूढे जोमाणे कामाला लागा तसेच अधिकाधिक नवनवे पीक व विविध विविध प्रकारची अधिक भाजी लागवड करत व्यवसाय करावा यासाठी शासनाच्या कृषिखात्याकडून वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन सचोटीने करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन प्रसंगी यावेळी दिले. तसेच सर्व सामान्य शेकरी वर्गाला व त्यांना दिनदर्शिका समजेल अशा सध्या आणि सोप्या भाषेत सन २०२२ च्या कृषीदिनदर्शिका चे प्रकाशन करण्याचा भाग्य लाभल्याचा आनंद व्यक्त करत येणाऱ्या नवं वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करुन व श्रीगणेश प्रतिमेचे पूजन करून उपस्तित मान्यवरांचे प्रतिष्ठानच्या वतीने शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष दिवकर यांनी केले.प्रस्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेशजी भगत यांनी केले तर धनंजय जोशी यांनी नैसर्गिक शेती समंधी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.तर उपस्थित मान्यवर व जमलेल्या शेतकरी बंधू भगिनींचे आभार प्रदर्शन पानसरे सरांनी आपल्या शब्द शैलीत सादर करून सर्वांना येत्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे संचालक सल्लागार खेळू थिटे व त्यांचे सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog