हुश्श...
रोहेकरांना तब्बल सहा दिवसांनी मिळाले पाणी!
नवीन जलवाहिन्यांच्या फुटलेल्या भागाची तात्पुरती दुरुस्ती पाणीपुरवठा मध्यम गतीने सुरू!
कोलाड (श्याम लोखंडे ) गेल्या सहा दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी तडफडणाऱ्या रोहेकरांना तब्बल सहा दिवसांनी अखेर पाणि मिळाले. नवीन जलवाहिन्यांच्या फुटलेल्या भागाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात यंत्रणेला यश आले असले तरी नवीन आले असले तरी नवीन आणि जुनी पाईपलाईनचा ताळमेळ होत नसल्याने या वाहिनीला प्रेशरमुळे भगदाड पडत असल्याने पाणि पुरवठा धीम्या गतीने सुरू करण्यात आले आहे.
जलवाहिनीच्या फुटलेल्या भागांची गेले पाच दिवस सातत्याने दुरुस्ती केल्यानंतर सहाव्या दिवशी सकाळी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा सुरू झाला. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी तडफडणाऱ्या आणि अंघोळीसाठी धडपडणार्या रोहेकरांचा जीव अक्षरशः भांड्यात पडला. रोहा नगरपालिकेने सुमारे 12 कोटी रुपये खर्च करून डोलवहाळ ते रोहे असे जलवाहिनीचे काम केले. गेल्या बुधवारी रोहा कोलाड रोड वरील क्लॅरियंट कंपनी जवळ या जलवाहिनीला पुन्हा एकदा भगदाड पडले. त्यामुळे रोहा नगरपालिकेला होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलले जाईल असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले. मात्र 12 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या जलवाहिनीच्या दुरुस्ती कामाचा दर्जा अत्यंत तकलादू असल्याने तसेच नवीन आणि जुन्या पाईपलाईनचा योग्यताळमेळ होत नसल्याने दुरुस्ती नंतरही या जलवाहिनीला सातत्याने कुठे ना कुठे भगदाड पडत होते. त्यामुळे पाच दिवस रोहेकरांना पाण्यावाचून काढावे लागले. रात्री उशिरा दुरुस्तीचे काम कसेबसे पूर्ण झाल्यानंतर सहाव्या दिवशी सकाळी टप्प्याटप्प्याने शहरात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गेले पाच दिवस टँकरच्या पाण्यावर कसेबसे दिवस ढकलणाऱ्या रोहेकरांची भीषण पाणी टंचाई तून सुटका झाली आहे.
ठेकेदाराची चौकशी करा.सल्लागार कमिटीला काळया यादीत टाका :-समीर शेडगे
एकीकडे रोहेकरांची पाण्यावाचून अशी बिकट अवस्था असताना त्यांच्या मदतीला शिवसेना धावून गेली. गेले पाच दिवस रोहे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी घरोघरी पाणी पोहोचवले. शिवसेनेने गेले पाच दिवस व रात्री टँकरने मोफत पाणी पुरवठा केल्याने नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान या पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या दर्जाची चौकशी करावी तसेच ठेकेदार, थर्ड पार्टी ऑडिट करणारी संस्था, आणि या कामावर देखरेख करण्यासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीला तात्काळ काळया यादीत टाकावे अशी मागणी तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment