माणसाने आपल्या हितासाठी जागणे महत्वाचे नाही, तर त्याचे हित कशात आहे, हे जाणणे महत्वाचे:-ह.भ.प. रुपेश महाराज शेळके

              गोवे-कोलाड (विश्वास निकम )

            माणसाने आपल्या हितासाठी फक्त जागा रहाणे महत्वाचे नाही तर त्याचे हित कशात आहे.हे जाणणे महत्वाचे आहे असे मत गोवे येथील सुनिल नवघरे यांचा १० वर्षांचा सुपुत्र आळंदी येथे पायी जाऊन तुळशीची माळ घातली त्या निमित्ताने सत्यनारायणाच्या पूजेनिमित्ताने आयोजित किर्तन सेवेत ह.भ.प. रुपेश महाराज शेळके यांनी आपले मत स्पष्ट केले.

                     अपुलिया हिता जो असे जागता l

                     धन्य माता पिता तयाचिया ll१ll

                      कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक l

                      तयाचा हरिक वाटे देवा ll२ll

                      गिता भागवत करिती श्रवण l

                       अखंड चिंतन विठोबाचे ll३ll

                       तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा l

                        तरी माझ्या दैवा पार नाही ll४ll

       या जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या चार चरणाच्या आधारे स्पष्ट करतांना ह.भ.प.रुपेश महाराज शेळके यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले कि एक शेतकरी आपली भाताची मळणी बैलानी खाऊ नये तो बैल जर भाताची मळणी खाण्यासाठी आला तर हे समजण्यासाठी आवाज येण्यासाठी बैलाच्या गळ्यात घंटा बांधून शेतकरी रात्री झोप न येण्यासाठी विड्या फुकत बसला होता.परंतु बैल ही हुशार होता.तो हळू पावलाने भाताच्या गंजी जवळ येऊन गंजीच्या एका भाऱ्याला गळ्यातील घंटा दाबून धरून एका बाजूची गंजी भस्त केली.नंतर शेतकऱ्यांनी पाहिले हेच या शेतकऱ्यांनी एक दोन वेळा मळणी भोवती फेऱ्या मारल्या असत्या तर भाताची मळणी वाचली असती याचे कारण शेतकऱ्याला आपले हित कशात आहे हे माहिती नव्हते.

         यासाठी तुकाराम महाराज म्हणतात जो आपल्या हितासाठी जागा आहे त्याचे माता पिता धन्य आहेत. व ज्याच्या कुळात कन्यापुत्र जन्माला आला त्याचा देवाला आनंद वाटतो.परंतु आताची पिढी भटकली आहे. ते आपले हित कशात आहे त्याचा विचार करीत नाही. ते आम मार्गाने जात आहे. त्यांच्यासाठी हा अभंग आचरण करणे महत्वाचे आहे.

              यावेळी ह.भ.प. दहिंबेकर महाराज,गायणाचार्य किरण ठाकूर, गणेश दिघे,मृदूंगमणी चेतन ओमले,अनंत सानप,शांताराम पवार, मिलिंद पवार,महादेव सुतार,दिनकर गुजर,पांडुरंग (पीएच )सानप,महादेव जाधव,मनोहर मांजरे, सुभाष वाफिळकर,सुधीर दिघे,दिनकर दहिंबेकर,रामा गुजर, रामचंद्र पवार,सुदाम जाधव,अरुण पवार,श्रीधर गुजर,रघुनाथ जाधव,नथुराम मांजरे,विजय जवके,रामचंद्र कापसे, व असंख्य नागरिक,तरुण वर्ग,व महिला मंडळ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog