बाहे येथील आयोजित क्रिकेट सामन्यात शिरवली संघ अंतिम विजेता

कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील गावदेवी बाहे आयोजित क्रिकेट सामन्यात रॉयल किंग शिरवली संघ ठरला अंतिम विजेता ठरला आहे अंतिम सामना शिरवली व धाकसुद चिल्हे यांच्यात झालेल्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अखेर रॉयलकिंग शिरवली संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकवला तर चिल्हे संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.तसेच स्पर्धेतील तृतीय क्रमांक गावदेवी बाहे हा संघ मानकरी ठरला. उत्कृष्ट सामनावीर शिरवली संघाचा संकेत लहाने स्पर्धेतील उकृष्ट गोलंदाज शुभम भोईर, तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून चिल्हे संघाचा संघाचा नितेश कोंडे यांना प्रमुख पाहुण्याच्या शुभहस्ते गौरविण्यात आले .

खांब विभागीय क्रिकेट असोसिएशन च्या मान्यतेने गावदेवी बाहे यांच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धा निसर्गरम्य महिसदरा पत्राच्या किनाऱ्यावरील प्रांगणात भव्य दिव्य असे क्रिकेट सामन्याचे उद्घाटन उदघाटन प्रगतशील शेतकरी लिंबाजी थिटे, क्रीडाप्रेमी कपिल बामणे, देवकान्हे ग्रामपंचायत सदस्य रविंद्र राऊत,मोरया डी जे साउंड सर्व्हिस चे मालक ज्ञानेश्वर थिटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.






त्स्फुर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या सदरच्या गावदेवी बाहे मित्र मंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धेला व क्रिकेट खेळाडूंना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्यासाठी देवकान्हे ग्राम पंचायतीचे सरपंच रायगड भूषण लोकशाहीर वसंत भोईर, उपसरपंच सुरज कचरे,मराठी उद्योजक नारायनशेठ कान्हेकर, पत्रकार रायगड भूषण डॉ.शामभाऊ लोखंडे, माजी सरपंच राजेश सुटे, कपिल बामणे,रोहा तालुका कुणबी युवक अध्यक्ष अनंत थिटे, ग्रामपंचायत सदस्य,रविंद्र राऊत, विलास थिटे, अशोक थिटे,मंगेश चव्हाण,दयाराम भोईर, मंगेश ठाकूर, प्रदीप गोविलकर,विश्वास माठळ आदी मान्यवरांनी सदिच्छा दिल्या.

तसेच कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी प्रदिप गोविलकर,अनिल जाधव, जगदीश थिटे, शिवाजी साळसकर, मनोज थिटे, रोशन ठाकूर, विजय नाकटे, सचिन बाळू थिटे, सूरज साळसकर,विश्वास माठल, रोहित देवकर, मनेश थिटे,प्रतीक थिटे, स्वप्नील चव्हाण, किरण जाधव, राकेश रमेश जाधव, रोशन मोरे,सागर सपकाळ,ज्ञानेश्वर थिटे(मोरया डीजे) व मंडळाचे पदाधिकारी युवक व सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog