देवकान्हे पिंपळवाडी येथे धर्मीक व आध्यात्मिक कार्यक्रमांनी दत्तजयंती उत्साहात साजरी 

खांब (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील पिंपळवाडी- देवकान्हे येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवा अंतर्गत श्री गुरू दत्तात्रेय जन्मोत्सव, सायंकाळी रोहा तालुका कोकणदिंडी वारकरी सांप्रदाय यांचे हरिपाठ तद्नंतर महाप्रसाद व रात्रौ ९ वा. ह.भ.प. दिनेशमहाराज कडव यांचे सुश्राव्य हरिकिर्तन आदी धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमांनी संपन्न झाले. 

यावेळी देवकान्हे ग्राम पंचायत सरपंच वसंत भोईर ,राजकीय तथा उद्योजक विजयराव मोरे, रोहिदास शेठ पाशीलकर,ज्ञानेश्वर साळुंखे,नारायण कान्हेकर,वरसे ग्राम पंचायत सरपंच नरेश शेठ पाटील,रुपेश कर्नेकर, लीलाधर मोरे, मुकेश भोकटे, रणपिसे, धनंजय आठवले,प्रकाश कोळी,घनश्याम कारले,सुनील थिटे सर पत्रकार नंदकुमार मरवडे,डॉ श्यामभाऊ लोखंडे,शुभम हातकामकर,यांनी दर्शनाचा लाभ घेत ग्रामस्थ मंडळाला शुभेच्छा देत सर्वांचे आर्थिक सहाय्य या कार्यक्रमाला लाभले.

तर विशेष सहकार्य म्हणून देवकान्हे ग्राम पंचायतीचे माजी सरपंच राजेश सुटे यांनी सर्व उपस्थित भक्तांना अन्नप्रसादाचा व गजानन भगत यांनी मिष्ठान्न चा लाभ दिला या सर्व कार्यक्रम संपन्न करण्यासाठी पिंपळवाडी-देवकान्हे ग्रामस्थ, महिला व तरुण मंडळाचे सर्व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य व अथक परिश्रम घेतले .

Comments

Popular posts from this blog