रोहा देवकान्हे येथील मोफत अस्थिरोग तपासणीला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
शंभरहून अधिक रुग्णांना मोफत दिली औषधे,
खांब (नंदकुमार कळमकर ) रोहा तालुक्यातील देवकान्हे येथे लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा आणि दीपक फाऊंडेशन रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रुप ग्राम पंचायत देवकान्हे यांच्या सहकार्याने डॉ.नमिता दिघे,डॉ.प्रशांत गोसावी,डॉ.स्नेहल शेलार,डॉ. विनोद गांधी ,आशा तज्ञांमार्फत अस्थिरोग रुग्णांना प्राथमिक तपासणी तसेच त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले.
यावेळी लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा चे उपाध्यक्ष डॉ.मंगेश सानप,दीपक फाऊंडेशन अजय आवाडे, देवकान्हे ग्राम पंचायत चे उपसरपंच सूरज कचरे,सदस्य दयाराम भोईर,शाळेचे मुख्याध्यापक टिकुळे, लायन्सक्लब कोलाड चे सेक्रेटरी रविंद्र लोखंडे,खजिनदार डॉ श्यामभाऊ लोखंडे ,बोर्ड ऑफ डायरेक्टर अनिल महाडिक,लायन महेश तुपकर,राजेंदर कोप्पू,विश्वास निकम,सौ पूजा लोखंडे,दीपक फाऊंडेशनचे सहकारी अश्विनी ऐत,अक्षरा जाधव,नाजुका चौलकर,मारुती निगडे,मल्लेश हंचली,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वास थिटे,आशा ताई,अंगणवाडी सेविका सह आदी मान्यवर व ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित होते.
प्रसंगी यावेळी फिजिओथेरपीष्ट तज्ञ डॉ स्नेहल शेलार यांनी उपस्थित रुग्णांना संधीवात मणक्याचे आजार यावर योगा द्वारे प्रात्यक्षिका करत सखोल मार्गदर्शन केले तसेच ऑर्थोपेडीक तज्ञ डॉ गोसावी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की सर्वांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे आहारात नेहमी पाले भाज्या व संक्रमित अन्यपदार्थ खावेत पाणी भरपूर प्यावे इतर कामांच्या व्यापाबरोबरच आरामाकडे देखील तेवढेच लक्ष केंद्रित करावे असा मोलाचा सल्ला दिला.
दीपक फाऊंडेशन आणि लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा यांनी दुर्गम आणि ग्रामीण भागात आयोजित केलेल्या अस्थिरोग तपासणीत 150 हुन अधिक रुग्णांची तपासणी करत त्यांना औषधे मोफत देण्यात आली.
Comments
Post a Comment