रोहा पाणीबाणी प्रकरण! 

ठेकेदार आणि सल्लागार एजन्सीवर कारवाई करा सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सभापतींसह शिवसेनेने केली मागणी,

कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा अष्टमी शहरात तब्बल सहा दिवस पाणी नव्हते. नवीन जलवाहिनी फुटल्याने प्रथमच पाणीबाणी सारखा प्रसंग ओढवला. जलवाहिन्यांचे काम दर्जाहीन झाल्याने हा प्रसंग घडला असल्याने संबंधीत ठेकेदार आणि सल्लागार एजन्सीची चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा अशी मागणी नगर पालिकेतिल सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या पाणीपुरवठा सभापती सुजाता चाळके यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी केली आहे.

रोहा अष्टमीत पाणीबाणी स्थिती निर्माण झाल्याने नागरिकांत प्रचंड संताप आहे. सहा दिवस अथक प्रयत्नातून रोहा शहराला पाणीपुरवठा पुन्हा नियमित सुरू झाला आणि नागरिकांनी निश्वास सोडला. अशात जलवाहिनी वारंवार दुरुस्त करावी लागते, जलवाहिनी फुटल्याने संबंध नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला, याची दखल घेत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा सभापती सुजाता चाळके यांनी बुधवारी मुख्याधिकारी रोहा यांना निवेदन दिले. पाणीबाणीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास झाला त्यामुळे पाईप लाईन फुटीला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी सभापती चाळके यांनी केली. दरम्यान स्वतः पाणीपुरवठा सभापती यांनी संबंधीतांवर कारवाई करण्याचे पत्र दिल्याने काम निकृष्ट दर्जाचे आहे, हे स्पष्ट होते. तरीही सत्तेत असलेल्या चाळके यांनी हे धारिष्ट दाखवल्याने आम्ही त्यांचे कौतुक करतो, असे सांगतात तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी या पाणी योजनेची कुंडली मांडली. १३ कोटी रुपये योजनेचे काम निकृष्ट आहे. शेजारील बिर्लाची लाईन फुटत नाही. मग नगरपरिषदेची जलवाहिनी का फुटते असा सवाल शेडगे यांनी उपस्थित केला. शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून भुयारी गटार योजना अर्धवट आहे. पाणी पुरवठा योजनेचे बारा वाजले आहेत, या ठेकेदारांची नावे काळ्या यादीत टाका, दोन्ही योजनांची सल्लागार एजन्सी असलेल्या निसर्ग संस्थेवर दंडात्मक कारवाई झालीच पाहिजे. यासाठी आम्ही सदर प्रकरणी संबंधित विभागाकडे रीतसर तक्रार दाखल करू असे समीर शेडगे यांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog