पहूर ग्रामपंचायतीच्या
निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार प्रचंड मताने निवडून येणार:- मंगेश कदम
सुतारवाडी : - ( हरिश्चंद्र महाडिक ) 21 डिसेंबर 2021 रोजी रोहा तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका होत आहेत. पहूर ( ता. रोहा ) या ग्रामपंचायतीच्या सदस्या जयवंती दत्तात्रेय तांदळेकर या कोरानाने मृत्यु पावल्याने एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या पोट निवडणुकीसाठी वार्ड क्र. 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या निता बबन उमासरे तर शिवसेनेच्या ऐश्वर्या यशवंत शिंदे हे उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात उतरले आहेत.
पहूर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. मंगेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, खासदार सुनिल तटकरे पालकमंत्री अदितीताई तटकरे आणि आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास केला असून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार निता बबन उमासरे या प्रचंड मताधिक्याने निवडूण येतील यात शंकाच नसल्याचे सरपंच श्री. मंगेश कदम तसेच अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी सांगितले. निवडणुकीसाठी पहूर येथून कामानिमित्त मुंबईकडे गेलेले नागरिक सुद्धा आपल्या गावाकडे निघाले असून राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडूण येईल असे सर्वत्र बोलले जात आहे.
Comments
Post a Comment