कोलाड नाभिक तरुण संघाचे विभागीय अध्यक्ष एकनाथ मोहिते तर सलून कमिटी अध्यक्ष किरण खंडागळे यांची निवड
गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील कोलाड-संभे येथील रायगड जिल्हा नाभिक समाज मंदिरच्या कै.पा.रा. सकपाळ सभागृहात शनिवार २५ डिसेंबर रोजी विभागीय कार्याध्यक्ष प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखालीकोलाड विभाग नाभिक तरुण संघाची सभा घेण्यात आली. या सभेत कोलाड विभागाची २०२२ सालासाठी नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी एकनाथ मोहिते,उपाध्यक्ष – किरण खराडे,दुकान कमिटी अध्यक्ष- किरण खंडागळे,सचिव-चंद्रकांत हुजरे,खजिनदार- अशोक पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी विभागीय अध्यक्ष संजय सकपाळ , सलून कमिटी अध्यक्ष किशोर खंडागळे, गजानन खराडे,केतन पवार,उत्तम साळुंखे,चंद्रकांत दिवेकर,बाळाराम पवार,वसंत खंडागळे, यशवंत मोहिते,दीपक टके,विवेक मोरे,संदेश खराडे,नीलेश पवार,सुनील खराडे,समीर खंडागळे तसेच विभागातील समाज बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment