रा.जि.प.शाळा भुवन येथे राष्ट्रीय छावा संघटना रायगड जिल्हाअध्यक्ष निलेशभाई महाडीक यांच्या तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप, 

 कोलाड (श्याम लोखंडे) भुवन येथील रा. जि. प. शाळा शाळा भुवन येथे 21डिसेंबर सकाळी ११वाजता राष्ट्रीय छावा संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष निलेश भाई  महाडीक यांच्या तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

         निलेशभाई महाडीक हे पुई  गावचे तरूण,असून   सामाजिक कार्यात अनेक युवकांचे प्रेरणास्थान असून आदर्श समाज सुधारक तसेच विविध क्षेत्रात त्यांचे नाव असुन त्यांना शिक्षणा विषयी प्रचंड आवड व तळमळ दिसुन येते . विद्यार्थी राष्ट्राचे आधारस्तंभ असून त्यांचा विकास हा लहान वयातच विद्यार्थी दशेतच व्हायला पाहिजे त्यासाठी सर्वांना  शिक्षण व शैक्षणिक साहित्य मिळणे गरजेचे आहे आणि हे मी माझे कर्तव्य समजतो असे त्यांचे मत आहे.

       या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले शाळा ही जीवनातील महत्त्वाची गोष्ट आहे . खुप शिका, मोठे व्हा समाजाचे ऋण फेडा . तसेच आपल्या आई_वडिलांसोबत आपल्या गुरूचेही नाव कमवा . हे शिक्षण तुमचे फुकट जाणार नाही या कडे लक्ष दया . जीवनात व्यासना धिनतेकडे वळू नका असा मोलाचा संदेश यावेळी मा . निलेश साहेब महाडीक यांनी दिला . 

      या वेळी उपस्थित कोलाड शहर अध्यक्ष ईकिंदर शेवाले, कोकण विभागीय उपाध्यक्ष श्री . राजु सुतार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष रूपेशजी कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक अशोक आनंदराव काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog