शिक्षण महर्षी उमाजी गोरीवले यांचे निधन!

शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व हरपल्याने सर्वत्र शोककळा,

 शिक्षण महर्षी कै. उमाजी गोरीवले

 कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील तिसे गावचे भाग्य विधाते तालुक्याचे वैभव तथा शिक्षण महर्षी शैक्षणिक सामाजिक आध्यात्मिक सांस्कृतिक कला क्रीडा व राजकीय क्षेत्रात अग्रेसर हट्टी आणि करारी बाणा मलखंबा खेळाचे प्रमुख वीर हनुमान मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच ग्रुप ग्राम पंचायत तिसे चे माजी सरपंच पंधरा वर्षे सरपंच पद भूषविले कुडली विभाग शेतकरी सेवा संघाचे माजी अध्यक्ष अत्यन्त प्रतिकूल परिस्थितीत गावात माध्यमिक शाळा उभारण्यात यशस्वी त्यामुळे या परिसरातील विविध समाज घटकातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे या करिता सन 2000 साली दिनाभाई मोरे शिक्षण संस्था सानेगाव संचालित तिसे गावात स्वतःच्या मालकीची शेत जमीन देत कै कृष्णाजी संभाजी गोरीवले यांच्या नावाने पहिले माध्यमिक हायस्कूल केले असे महान कर्तबगार थोर बुद्धिमान व्यक्तिमहत्व असलेले उमाजी गोरीवले यांचे 24 डिसेंबर रोजी मध्यरात्री वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले त्यांच्या निधनामुळे गोरीवले कुटूंबावर दुःखाचे डोंगर व तिसे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे .

उमाजी गोरीवले हे खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक शैक्षणिक सामाजिक कार्याबरोबरच राजकीय कारकीर्द मोठी त्यामुळे 15 वर्ष तिसे ग्राम पंचायतीचा सरपंच पदाचा कार्यभार संभाळत शैक्षणिक व सामाजिक शेतकरी संघटनेचे काम करत तिसे गावचे नाव देशपातळीवर पोहचवले आहे. खा सुनील तटकरे,माजी केंद्रीय मंत्री कै बॅ अंतुले, माजी आमदार कै अशोकशेठ साबळे,कै पा. रा. सानप ,यांच्या मार्गदर्शनाखाली महान कार्य केले .

शेतकरी वर्गाच्या पाठीशी व त्यांना नेहमी साद देणारे त्याच बरोबर समाजाची व सर्व समाज घटकांची न्याय निवडा व तंटे मिटवणारे गोरीवले यांच्या निधनाची वार्ता समजताच दीनाभाई मोरे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य नंदू म्हात्रे,राजिप सदस्य दयाराम पवार,आंबेवाडी ग्राम पंचायत चे सरपंच सुरेश महाबळे,खांब ग्राम पंचायत चे माजी सरपंच व विभागीय नेते रामचंद्र चितळकर, युवा नेते व खांब ग्राम पंचायत उप सरपंच मनोज शिर्के,रायगड जिल्हा कुणबी समाज समन्वय समितीचे सचिव शिवराम महाबळे,मारुती बुवा लोखंडे,रोहा तालुका माजी शिवसेना तालुका प्रमुख विष्णू लोखंडे,गणेश शिंदे,सुशील शिंदे, मोरे, सतांबेकर,खराडे,तसेच वीरशैव माहेश्वर मंडळ रोहा सुधागड चे माजी अध्यक्ष अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ सदस्य व गोरीवले यांचे अत्यन्त जिवलग सहकारी महेशस्वामी जंगम सह विविध स्तरावरील शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर व त्यांचे नातलग बहुसंख्येने अंत विधीसाठी जमले होते .

उमाजी गोरीवले यांच्या पश्चात यांच्या पत्नी एक मुलगा,पाच मुली,सून ,जावई, नातवंडे ,व मोठा गोरीवले परिवार,त्यांच्या अंत संस्कार प्रसंगी अनेक विविध समाजातील तसेच राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील समाज घटकांनी त्यांच्या वैवाहिक जीवनातील प्रवासाच्या दुःख भावना या प्रसंगी व्यक्त करत करत आदरांजली व श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले तसेच त्यांचे पुढील दशक्रिया विधी रविवारी 2 जानेवारी व उत्तरकार्य मंगळवारी 4 जानेवारी 2022 रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी मौजे तिसे येथे संपन्न होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 आदिवासी समाजाला सदैव मार्गदर्शन करणारे सच्चे मार्गदर्शक प्रेरणास्थान हरपले:- जिल्हाध्यक्ष भिवा पवार

 आदिवासी समाज शिकला पाहिजे सुसंस्कारित झाला पाहिजे म्हणून सदैव तळमळीने शैक्षणिक कार्य करून आदिवासी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणारे उमाजी गोरीवले यांचे निधन झाल्याने आम्हाला शैक्षणिक सामाजिक चळवळीत सदैव मार्गदर्शन करणारे आमचे प्रेरणास्थान हरवल्याची खंत रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पत्रकार भिवा पवार यांनी व्यक्त केली

ज्या ज्या वेळी आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार  व्हायचे त्या त्या वेळी  त्यांना मार्गदर्शन करून आदिवासी समाजाच्या तन-मन-धनाने पाठी उभे राहायचे त्यांचे निधन झाल्याने आदिवासी समाजाचे सच्चे मार्गदर्शक प्रेरणास्थान हरपल्याची खंत रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार भिवा पवार व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog