जय हनुमान मित्र मंडळ गोवे आयोजित कबड्डी स्पर्धेत स्वयंभू वरसगांव संघ अंतिम विजेता

    गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील मौजे गोवे येथील निसर्ग रम्य परिसरात व विद्युत प्रकाशाच्या रोषणाईत खेळविण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत स्वयंभु वरसगांव व जय बजीरंग आंबेवाडी यांच्या झालेल्या अटीततीच्या व शेवट पर्यंत रंगतदार ठरलेल्या सामन्यात अखेरच्या क्षणी स्वयंभु वरसगांव संघाने जय बजीरंग आंबेवाडी संघाचा पराभव करुन विजेते पद पटकावले.तर आंबेवाडी संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. 

               जय हनुमान मित्रमंडळ गोवे यांच्या तर्फे व कोलाड विभागीय असोसिएशनच्या मान्यतेने गोवे येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्धघाटन गोवे ग्रामपंचायत आदर्श सरपंच महेंद्र पोटफोडे, खांब विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव, माजी सरपंच सुप्रिया जाधव, माजी उपसरपंच नितीन जाधव,संदीप जाधव, युवानेते राकेश कापसे,राजेंद्र जाधव, नितीन जवके, महाडिक सर,कोलाड विभाग असोसिएशनचे अध्यक्ष गणेश सानप यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

           यावेळी गोवे गावाकमेटी अध्यक्ष नामदेव जाधव,सचिव श्रीधर गुजर, खजिनदार कमलाकर शिर्के,पोलीस पाटील सुरेश जाधव,तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम पवार,माजी अध्यक्ष राजेश शिर्के,माजी सचिव लीलाधर दहिंबेकर,गोवे खांब क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र जाधव,सचिव शरद वारकर,भरत जाधव,नितीन वारकर,बळीराम जाधव,शंकर दहिंबेकर,शांताराम घरट,बाळाराम जाधव,रामचंद्र कापसे,मनोहर मांजरे,स्वप्नील सानप,महेंद्र जाधव,रामा गुजर,सुरेश जाधव,नंदा जाधव, महादेव जाधव,बाबु पवार,दिनकर दहिंबेकर,नंदा वाफिळकर,गोविंद गायकवाड,गोवे कब्बडीचे प्रशिक्षक मधुकर धामणसे,रविंद्र जाधव,अरविंद पवार, श्रीराम मंचेकर,विजय जवके व रोहा तालुक्यातील असंख्य कबड्डी प्रेमी उपस्थित होते.

                  तर स्पर्धेत पालेखुर्द ब संघ तृतीय तर वीर हनुमान संभे संघ चतुर्थ क्रमांकाचे मानकरी संघ ठरला, तर मालिका वीर वरसगांव संघाचा राज आंब्रुस्कर, उत्कृष्ट चढाई आंबेवाडी संघाचा अकीलेश घाडगे, उत्कृष्ट पक्कड वरसगांव संघाचा सौरभ पोटफोडे, तर पब्लिक हिरो संभे संघाचा प्रसन्न सकपाळ ठरला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजदीप जाधव व पांडुरंग जाधव यांनी केले.कबड्डी स्पर्धा यशस्विकरण्यासाठी जय हनुमान मित्र मंडळाचे पदाधिकारी, सर्व सदस्य, समस्त ग्रामस्थ मंडळ गोवे यांनी मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog