नम्र पणाने भक्ती केली तर सुख मिळतो :-ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाटील

  खांब- पुगाव (नंदू कलमकर ) आळंदी मध्ये जोग महाराजांचा स्वतंत्रपूर्वीचा काल त्या काळात जोग महाराजांकडे एक सावकार आला व जोग महाराजांना म्हणाला मी तुम्हाला एक लाख रुपये देतो त्या पैश्याचे तुम्ही काही करा त्या पडत्या काळात ही जोग महाराजांनी ते पैसे घेण्यास नाकारले तेव्हा तो सावकार जोग महाराजांना म्हणाला कि मी एक लाख रुपये देणारा जगात पाहिला माणूस असेल पण त्यावर जोग महाराज यांनी उत्तर दिले कि तुम्ही पैसे देणारे जगातील एकमेव माणूस आहात परंतु या पडत्या काळातही पैसे न घेणारा एकमेव माणूस आहे.त्याने नम्र पणाने भक्ती केली म्हणून ते सुखी झाले.या जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज पाटील यांनी आयोजित किर्तन सेवेत स्पष्ट केले.

                  यावेळी गायनाचार्य रविंद्र मरवडे, गणेश दिघे, दळवी महाराज, ज्ञानेश्वर दळवी, महादेव महाबळे, प्रदीप महाबळे, जेष्ठ नेते तानाजी जाधव,गोवे ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पोटफोडे, खांब विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव,माजी उपसरपंच नितीन जाधव, संदीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पवार, शांताराम पवार,सुधीर दिघे,रामचंद्र पवार,दिनकर दहिंबेकर,राजेश शिर्के,रामा गुजर,हरिचंद्र जाधव,मनोहर मांजरे,रामचंद्र कापसे,कोलाड पंचक्रोशीतील असंख्य नागरिक,गोवे ग्रामस्थ, महिला मंडळ व तरुण वर्ग उपस्थित होते.

             रोहा तालुक्यातील मौजे गोवे येथे सालाबाद प्रमाणे हनुमान जयंती उत्सवानिमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा, किल्ला व कोलाड विभाग वारकरी संप्रदाय यांचा हरिपाठ,रात्री ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाटील खानावकर (खोपोली )यांची किर्तन सेवा, नंतर हरि भजनाचा कार्यक्रम तसेच दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात आयोजित करण्यात करण्यात आला. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्या साठी गावकमेटी अध्यक्ष नामदेव जाधव, सचिव श्रीधर गुजर, उपसचिव प्रवीण पवार, खजिनदार कमलाकर शिर्के, उपखजिनदार सुरेश जाधव(पोलिस पाटील), सदस्य बळीराम जाधव, राजेंद्र जाधव,शंकर दहिंबेकर,रमेश वारकर,पांडुरंग शिर्के, सुरेश जाधव,शांताराम घरट,नथुराम मांजरे,लीलाधर दहिंबेकर,किसन ठाणेकर, दिनेश पवार,नितीन वारकर,जयसिंग पवार,शैलेश पवार,सर्व रेल्वे कर्मचारी तसेच ग्रामस्थ मंडळ, तरुण वर्ग, महिला मंडळ मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog