विद्यार्थी भारती, जिनियस मैत्रकूल, आयोजित नाळ महाराष्ट्राशी संस्कृतीशी निजामपूरात कार्यक्रमाचे आयोजन! 

 निजामपूर (प्रतिनिधी)नाळ महाराष्ट्राशी.. संस्कृतीशी.विद्यार्थी भारती संघटना घेऊन येत आहे महाराष्ट्र दिनानिमित्त नाळ महाराष्ट्राशी.संस्कृती शी.हा कार्यक्रम १ मे २०२२ रोजी संध्याकाळी ५ ते ९ ह्या वेळेत रसिक भाई मेहता कंपाउंट,निझामपूर बस स्टॉप समोर इथे हा कार्यक्रम होणार आहे, असे राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष तेजस भोसले ह्यांनी सांगितले.

 वैभव संपन्न असलेल्या महाराष्ट्राच्या वैविध्याचे सांस्कृतिक दर्शन घडवून आणत लोप पावत चाललेल्या कलांना उजाळा देत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे पूर्णजीवन करण्याचा निर्मळ प्रयत्न म्हणजेच,नाळ महाराष्ट्राशी संस्कृतीशी असे संघटनेच्या राज्यकार्यध्यक्ष साक्षी भोईर ह्यांनी सांगितले.

    (आकाश तायडे)गार्गी लावणी सम्राट थेट नागपूर हुन आपल्या नृत्य आविष्काराने महाराष्ट्राची संस्कृती ढोलकीच्या तालावर आणि त्याच्या अदाकारी ठेक्यावर सादर करण्यासाठी येत आहे.त्याचबरोबर नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे तसेच लोकशाहीर दत्ताराम मात्रे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे,लोकशाहीर दत्ताराम मात्रे ते त्याची काही गाणी सादर करणार आहेत असे चिरंजीवी संघटनेच्या राष्ट्रीय सचिव श्वेता पाटील ह्यांनी सांगितले.

   लावणी, कोळीगीत, दिंडी नृत्य,वाघ्या,मुरळी, धनगरी, राजा, तारपा, चेऊळी, जाखडी नृत्य,बांगडी नृत्य, दशावतार अशा अनेक नृत्यप्रकारांचे सादरीकरण बघायला मिळणार आहे असे चिरंजीवी संघटनेच्या राज्यध्यक्ष नेहा भोसले ह्यांनी सांगितले.

  महाराष्ट्र गौरव ,माणगाव गौरव ,संघर्ष गौरव ,एकलव्य पुरस्कार ,विद्यार्थी भूषण असे विविध पुरस्कार तसेच काही वक्त्याचे मार्गदर्शन होणार असल्याची माहिती गंगासागर गुड्डया ह्यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog