येरळ ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ. संध्या प्रकाश मोरे सुतारवाडी ग्रामस्थांतर्फे सत्कार
सुतारवाडी (हरिश्चंद्र महाडिक)येरळ ग्रामपंचायतीच्या पूर्वीच्या उपसरपंचांचा कार्यकाळ संपल्यामुळे उपसरपंच पदाच्या रिक्त झालेल्या पदाकरीता सुतारवाडी येथील सौ. संध्या प्रकाश मोरे यांची येरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी येरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.विमल दळवी तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.सौ. संध्या प्रकाश मोरे यांची येरळ ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी निवड होताच सुतारवाडी ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सौ. संध्या मोरे यांनी उपसरपंच पदाचा कार्यभार स्विकारल्या नंतर सांगितले. खासदार सुनिल तटकरे साहेब, रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे आणि आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी सर्वांना बरोबर घेवून यशस्वी करेन.
Comments
Post a Comment