ओबीसीचें राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार :- चंद्रकांत बावकर

ओबीसी जनमोर्चाच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी सुरेश मगर यांची निवड! 

कोलाड (श्याम लोखंडे ) ओबीसींच्या न्यायी हक्कासाठी लढा चालु आहे.ओबीसीचे राजकीय आरक्षणावर नाहीसे करण्यात आले आहे. आणि तो मिळविण्यासाठी आमचा लढा चालु आहे.आम्ही ओबीसींचे राजकीय आरक्षण निश्चितच पुनर्स्थापित करणार आहोत.परंतु बहुसंख्येने असलेल्या ओबीसींना सर्व राजकीय पक्षांनी प्रतीनिधीत्व देताना ८० ओबीसींचा विचार करावा असे ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी माणगाव येथील कुणबी भवन येथे आयोजित ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जमोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणी निवडी करण्यात आली या प्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी ओबीसी जनमोर्चा उपाध्यक्ष जे.डी.तांडेल, सरचिटणीस अरविंद डाफळे, चिटणीस कृष्णा वणे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार,शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे,ओबीसी जनमोर्चा जिल्हा समन्वयक उदय कटे, माणगाव तालुका अध्यक्ष अरुण चाळके, ॲडव्होकेट  मनोजकुमार शिंदे,शिवराम महाबळे,तळा तालुका अध्यक्ष सचिन कदम,जिप सदस्य रमेश मोरे, मा.उपसभापती रामा सकपाळ,मुरुड तालुका अध्यक्ष सी.एम.ठाकूर,सुभाष भोनकर,सरचिटणीस राजेंद्र खाडे, ॲडव्होकेट मंगेश हुमणे,रोहा सरचिटणीस महादेव सरसंबे आदी मान्यवर उपस्थित होते ,

यावेळी जेडी तांडेल यांनी आपण सर्व ओबीसी समाज बांधवांनी विखुरलेले न रहाता संघटीत होवुन ओबीसीचे काम करणे आवश्यक आहे.ओबीसी समाजात जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.अरविंद डाफळे यांनी ओबीसीचे प्रश्न ज्वलंत असून आपण एकत्रीत येत सोडविण्याची गरज असल्याचे सांगितले.

प्रसंगी यावेळी ओबीसी जनमोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून जिल्हा अध्यक्षपदी रोहा तालुक्यातील सुरेश मगर यांची नियुक्ती करण्यात आली,उपाध्यक्ष प्रदुम ठसाळ,उपाध्यक्ष सी.एम.ठाकुर,सुदाम शिंदे,सरचिटणीस अशोक पाटील,चिटणीस रोशन पाटील,महादेव पाटील,कार्यकारिणी सदस्य भास्कर पवार,अरुण चाळके, राजेंद्र खाडे,सचिन कदम,कृष्णा खांडेकर,महादेव सरसंबे, ॲडव्होकेट रुपेश पाटील,रविंद्र मांडावकर,रामचंद्र सकपाळ,अनंत खराडे,रत्नाकर लंबाडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

यावेळी जिल्हा अध्यक्ष पदी निवडी नंतर सुरेश मगर यांनी रायगड जिल्ह्यात ओबीसी संघटना वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बांधणार असल्याचे सांगत अधिक ओबीसीला राजकीय स्थरावर व विविध मागण्यांसाठी प्रयत्नशील राहणार आहे .याबैठकीत कृष्णा वणे,अशोक पाटील यांनी मनोगत सुत्रसंचलन राजेंद्र खाडे व आभार उदय कटे यांनी मानले या बैठकीस रायगड जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog