मराठी उद्योजक रामशेठ कापसे यांच्या निवास स्थानी राम नवमी उत्सव मोठया उत्सहात साजरा

       गोवे-कोलाड (विश्वास निकम )रोहा तालुक्यातील मौजे मूठवली येथील मराठी उद्योजक तथा गोवे ग्रामपंचायत माजी सरपंच रामशेठ कापसे यांच्या निवास्थानी सालाबाद प्रमाणे रविवार दि.१०/४/२२ रोजी राम नवमी उत्सव मोठया उत्सहात साजरा करण्यात आला.

            गेली दोन वर्षी पासून कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आला होता. त्यामुळे सर्व कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली होती.त्यामुळे विविध प्रकारचे कार्यक्रम घरच्या घरी केले जात होते. परंतु यावर्षी सर्व नियम शिथिल करून सर्व कार्यक्रम साजरे करण्यासाठी परवानगी मिळाल्या नंतर सर्व कार्यक्रम मोठया उत्सहात संपन्न होत आहेत. यनिमित्ताने रामशेठ कापसे यांच्या निवास्थानी गेली २१ वर्षांपासून राम नवमी उत्सव सुरु असून सकाळी साईबाबांच्या मूर्तिचे पूजन व आरती,नंतर दुपारी श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी ६ ते ७ महिला मंडळ पुगांव यांचा हरिपाठ,नंतर महाप्रसाद व रात्री महिला मंडळ पुगांव यांच्या हरि भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

 यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायणराव धनवी,गोवे ग्रामपंचायत आदर्श पुरस्कार प्राप्त सरपंच महेंद्र पोटफोडे, विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव, गोवे ग्रामपंचायत माजी सरपंच सदेश कापसे,माजी सरपंच नंदकुमार कापसे, बी एस भोसले, भरत कापसे, नाना कापसे, प्रमोद लोखंडे,बाळ कापसे, मधुकर कापसे,महादेव सुतार तसेच खांब परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, मूठवली येथील ग्रामस्थ,महिला वर्ग व असंख्य तरुण वर्ग उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog