विज ग्राहकांना अतिरीक्त अनामत रक्कमेसाठी सक्ती करू नये :- भाजप युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष अमित घाग यांची निवेदनाद्वारे मागणी 

रोहा (प्रतिनिधी) महाराष्ट्र विज वितरण कंपनीचे माध्यमातुन माहे मार्च २०२२ च्या बिला सोबत अनामत सुरक्षा रक्कमेचे बिल देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिटरची सुरक्षा ठेव / अनामत रक्कम यापुर्वीच ग्राहकांनी भरलेली आहे . असे असताना देखील विज वितरण कंपनीच्या माध्यमातुन जाणीवपुर्वक अनावधानाने दिलेली सुरक्षा ठेव ही अतिरिक्त बिले ग्राहकांना दिलेली आहेत . त्यामुळे विज वितरण कंपनीने या महीन्यात दिलेली अनामत / सुरक्षा ठेव रकमेबाबत खुलासा करून ती रद्द करावी व कोणत्याही ग्राहकावर सक्ती करू नये अशी मागणी भायुमो जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात विज वितरण कंपनीने सुरक्षा ठेव अतिरिक्त बिलासंदर्भात खुलासा करून नागरीकांना अनामत / सुरक्षा रक्कमे बाबत सक्ती न करता त्याला ती न भरण्याचे आव्हान करावे . तसे न झाल्यास भाजपाकडून नागरीकांना ते न भरण्याचे आवाहन करण्यात येईल, तसेच विज वितरण कंपनीने अतिरिक्त बिल वसुली केली असे आढळल्यास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून  विजवितरण कंपनीचे कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यांत येईल असा ईशारा भारतीय जानता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या समवेत राजेश डाके, उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog